Ceasefire: 'हे युद्ध अमेरिकेच्या पापाने थांबवले का?' युद्धबंदीच्या निर्णयावर संजय राऊत संतापले, थेट अंधभक्तांवर टीका

Sanjay Raut Slams Govt: युद्धबंदीच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला
Sanjay raut News
Sanjay rautSaam tv
Published On

ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सलग तीन दिवस भारतावर हल्ला चढवला. मात्र, भारताने देखील चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. अशा तणावपूर्ण स्थितीत अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे शनिवारी संध्याकाळी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, या पार्श्वभूमीवरही पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूच आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही योग्य संधी होती पण..

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची ही योग्य संधी होती. अशा वेळी आपण शस्त्रसंधी का मान्य केली? कोणाच्या सांगण्यावरून केली? व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार भारताने ट्रम्प यांच्या सूचनेवरून युद्धबंदी मान्य केली, हे सत्य आहे. मग आपण स्वतंत्र राष्ट्र आहोत की अमेरिकेच्या अधीन?' असा खणखणीत सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sanjay raut News
Pune News: 'पाकिस्तान जिंदाबाद' इंजिनिअर तरूणीवर कॉलेजकडून कारवाई; तपासात धक्कादायक माहिती समोर

माघार घ्यायची गरज काय?

'युक्रेन रशिया युद्धावेळी भाजपने जाहीर केलं होतं, की पापाने वॉर रूकवा दी. मग आता हे युद्ध अमेरिकेच्या पापाने थांबवले का? बदला लेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे, अशी मोदींची भाषा होती, मग तुकडे पाडले का? पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतायेत की त्यांनी हे युद्ध जिंकले आहे. आता कुठे गेले अंधभक्त?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay raut News
Nanded News: जमिनीच्या जागेवरून वाद, महिला सरपंच अन् त्यांच्या पतीला शेतावरच बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

युद्धबंदीचा निर्णय घेणं योग्य आहे का?

'आपल्या जवानांनी बलिदान दिलं, २६ महिलांचे कुंकू पुसले गेले. अशा वेळी आपण ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरून युद्धबंदी स्वीकारतो? ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय युद्धबंदीचा निर्णय घेणं योग्य ठरतं का?' असा घणाघात करत राऊतांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

Sanjay raut News
Palghar: आधी डोकं आपटलं नंतर गळा आवळून संपवलं, मुलाच्या हत्येनंतर बापानेही गळफास घेतला; पालघरमध्ये खळबळ

युद्धबंदीच्या निर्णयावर सखोल चर्चा होणं गरजेचं

या पार्श्वभूमीवर, राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तातडीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. 'या निर्णयामुळे केवळ सैन्याचं नव्हे, तर देशाचंही मनोबल खचलं आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान होऊ नये, म्हणून युद्धबंदीच्या निर्णयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे,' असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com