Alisha Khedekar
नमस्कार, मी अलिशा अनुजा अनंत खेडेकर.
मी साम टीव्ही या चॅनलच्या वेबसाईटसाठी मल्टिमिडीया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. जून २०२५ मध्ये साम डिजिटल मिडियामध्ये रुजू झाले.
साममध्ये येण्यापूर्वी प्रहार या वृत्तपत्राच्या वेबसाईट साठी काम करत होते. राजकारण, मनोरंजन, नवीन ट्रेंड, लाईफस्टाईल, स्थानिक, क्राईम, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय या विषयांवर लिहिण्याची आवड आहे.
शिक्षणाच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचे झाल्यास, मुंबईतील माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण पूर्ण केले आहे.