MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत ठिणगी; शिंदेसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

BJP Vs Shinde Sena Nashik MLC Election Dispute: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे सेनेच्या ताब्यातील जागेवर भाजपने दावा केल्याने राजकीय वाद चिघळला असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावरून संघर्ष उभा राहिला आहे.
Political tension rises in Nashik as BJP and Shinde Sena clash over Legislative Council seat within Mahayuti alliance.
Political tension rises in Nashik as BJP and Shinde Sena clash over Legislative Council seat within Mahayuti alliance.saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृतपणे दावा ठोकला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, अशी आक्रमक मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी थेट प्रदेश कार्यकारणीकडे केली आहे.

Political tension rises in Nashik as BJP and Shinde Sena clash over Legislative Council seat within Mahayuti alliance.
MPSC Bharti 2026: आनंदाची बातमी! MPSC द्वारे घेतली जाणार तलाठी भरती; १७०० जागांसाठी होणार परीक्षा

एकीकडे शिंदेसेनेतच या जागेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू असताना, आता भाजपनेही शड्डू ठोकल्यामुळे महायुतीमधील तिढा कमालीचा वाढला आहे.

भाजपचा दावा का?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण 622 मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता भाजप हा सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे लोकशाहीत संख्याबळाला महत्व असल्याने ही जागा भाजपकडेच यावी असा स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.

Political tension rises in Nashik as BJP and Shinde Sena clash over Legislative Council seat within Mahayuti alliance.
कॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद, नेमकं कारण काय? संस्थापक म्हणतोय, 'ज्याची भीती होती, तेच झालं'

नाशिक विधानपरिषदेसाठी पक्षीय बलाबल

एकूण जागा - ६२२

भाजप - १९०

शिंदे सेना - १७१

राष्ट्रवादी ( AP ) - १०७

ठाकरे सेना - ४५

इस्लाम पार्टी - ३५

एमआयएम - २१

काँग्रेस - १३

इतर / अपक्ष - ४१

Political tension rises in Nashik as BJP and Shinde Sena clash over Legislative Council seat within Mahayuti alliance.
ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

शिंदेसेनेत आधीच अंतर्गत स्पर्धा

सध्या ही जागा शिंदेसेनेच्या ताब्यात असल्याने या जागेवर पुन्हा आपलाच उमेदवार असावा, यासाठी शिंदेसेनेचे स्थानिक नेते आग्रही आहेत. पक्षात उमेदवारीसाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने आधीच पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू होती. त्यात आता भाजपने 190 जागांच्या संख्याबळाचा हवाला देत थेट दावा केल्यामुळे शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com