कॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद, नेमकं कारण काय? संस्थापक म्हणतोय, 'ज्याची भीती होती, तेच झालं'

Cockroach Janata Party’s X Account Suspended: कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत X अकाऊंट अचानक बंद करण्यात आले आहे.
Cockroach Janata Party’s X Account
Abhijeet Deepke reacts after the suspension of Cockroach Janata Party’s official X account.
Published On

Cockroach Janata Party X Account Suspended : भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या एका विधानावरून सुरू झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे 'X' अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टातील एका सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे 'कॉकरोच'शी केली होती. या विधानाचा निषेध म्हणून तरुणांनी थट्टा-मस्करीमध्ये या पार्टीची स्थापना केली होती. या पार्टीला सोशल मीडियावर लाखो लोकांनी फॉलो केले होते. पण आज अचानक यांचे एक्स खाते बॅन करण्यात आले. याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही.

सुप्रीम कोर्टात एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या त्या वक्तव्यावर मोठा गदारोळ झाला. वाढता वाद पाहून नंतर त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरणही दिले होते. पण संतापलेल्या तरुणांनी कॉकरोच जनता पार्टी या अनोख्या डिजिटल पार्टीची सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांतच या 'कॉकरोच जनता पार्टी'ला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु आता अचानक या पार्टीचे अधिकृत 'X' अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 'X' वर पक्षाचे खाते बंद झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांना ज्याची भीती होती तेच घडले आहे आणि त्यांचे पेज बॅन करण्यात आले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले, "त्यांना ज्याची भीती होती तेच घडले आहे. आधी त्यांनी आमचे खाते हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते अयशस्वी झाले, तेव्हा त्यांनी ते बॅन केले. आमचे अधिकृत 'X' खाते सध्या भारतात उपलब्ध नाही."

Cockroach Janata Party’s X Account
Cockroach Janata Party’s X Account
Cockroach Janata Party’s X Account
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी राहिलेल्या 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी, सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितले, वाचा

इंस्टाग्रामवर भाजपपेक्षा जास्त फॉलोअर्स -

'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) अवघ्या पाच दिवसांत इन्स्टाग्रामवर (Instagram) तब्बल १० दशलक्ष (१ कोटी) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. अभिजित दिपके नावाच्या तरुणाने १६ मे रोजी सुरू केलेल्या या पेजने फॉलोअर्सच्या बाबतीत थेट भारतीय जनता पार्टीच्या (BJP) अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटलाही (ज्याचे सुमारे ८.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत) मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवरील या तुफानी लोकप्रियतेसोबतच त्यांच्या 'X' अकाऊंटलाही १ लाख ८० हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले होते. पण हे अकाऊंट आता बॅन करण्यात आले आहे.

Cockroach Janata Party’s X Account
Cockroach Janata Party : सरकारची चूक! शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; कॉकरोच पार्टीचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com