ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

Bhandara ST bus accident father son death : भंडाऱ्यात एसटी बसने बापलेकाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
ST BUS
ST bus news Saam tv (संग्रहित छायाचित्र)
Published On

शुभम देशमुख | भंडारा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Bhandara ST bus accident news today : एसटी बसने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील बापलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज रात्री साडेसात वाजताच्या सुमारास भंडारा एसटी डेपोत घडली. मृतक हे भंडारा शहरातील चांदणी चौक येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर परिसरात एकच गर्दी झाली होती. अनेकांनी एसटी चालकाला मारण्याचाही प्रयत्न केला. संतप्त नागरिकांनी एसटी डेपोत गर्दी केली.

रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. मृतक रोहित यांचा आरो प्लांटचा व्यवसाय असून ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीने एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

ST BUS
बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

अपघातच्या घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्यातील शहरातील शेकडो नागरिक शासकीय रुग्णालय आणि एसटी डेपो परिसरात जमा झाले. रूग्णालय आणि एसटी डेपोत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

ST BUS
Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

विरारमध्ये नाल्याची भिंत तोडून मर्सिडीज कारचा भीषण अपघात

विरार महामार्गाकडून विरार शहराकडे येत असताना लहान मुलाला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला आहे. नाल्याची भिंत तोडून आणि गाडीचे दोन्ही टायर निटपून (किंवा तुटून) कार थेट नाल्यात कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कारला बाहेर काढण्यात आले आहे.

ST BUS
Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com