

MPSC कडून भरती जाहीर
१७०० तलाठी पदांसाठी भरती जाहीर होणार
एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
राज्यातील अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करतात. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केल्यानंतर राज्य सरकारच्या विविध विभागात काम करण्याची संधी मिळते. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ही भरती विविध विभागांमध्ये होणार आहे. यामध्ये एकूण ३३ विभागांमध्ये ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत.
विविध विभागांधून स्वतंत्र्यपणे परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात असल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याची टीका होत होती. त्यामुळे सरळसेवा भरती एमपीएससीकडे देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. यासाठी सरकारने सरळसेवा भरती एमपीएससीकडे देण्याचा निर्णय घेतला. एमपीएससी’कडे सरळसेवा भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांची संख्या वाढणार आहे.
आता १७०० पेक्षा जास्त पदांची भरती एमपीएससीकडून होणार आहे. प्रत्येक कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेला वेग येणार आहे.
महसूल विभागाने १७०० पेक्षा जास्त तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत.जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत असून त्यानंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली. त्यामध्येच या भरतीचादेखील समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.