संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू
धावण्याच्या चाचणीवेळी अचानक मैदानात कोसळला
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले
बीडनंतर दुसरी घटना घडल्याने सुरक्षिततेबाबत चिंता
माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर
राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरू आहेत. पोलीस भरतीसाठी प्रचंड उन्हातही हजारो उमेदवार मैदानात परीक्षा देताना पाहायला मिळतायत. बीडमध्ये या पोलीस भरतीदरम्यान ११ फेब्रुवारी रोजी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे (वय २३) हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. रनिंग सुरू असताना अचानक तो मैदानात कोसळला.
उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
परळीतील दिपक हा पोलीस भरतीसठी बीडमध्ये पोहोचला होता. पोलीस भरतीत १६०० मीटर धावण्याची परीक्षा होती. या परीक्षेमुळे सकाळपासून तो पुरेसे पाणी प्यायला नव्हता. सकाळपासून पाणी न प्यायलेल्या दिपकला डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आला असावा. त्यानंतर दिपकला मैदानात भोवळ आली. भोवळ आल्याने दिपकला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.