दोन दिवसांचा दुखवटा जाहीर, भाजप नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Om Prakash Gupta Death Due To Lack Of Emergency Services: उत्तरप्रदेशमध्ये रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष ओम प्रकाश गुप्ता यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Family members mourn as outrage grows over BJP leader Om Prakash Gupta’s death due to ambulance delay in Uttar Pradesh.
Family members mourn as outrage grows over BJP leader Om Prakash Gupta’s death due to ambulance delay in Uttar Pradesh.saam tv
Published On

रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरण सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशच्या बशीरगंज येथील भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष ओम प्रकाश गुप्ता यांना सोमवारी रात्री छातीत दुखायला लागले त्यामुळे त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती पाहून त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र दोन तास रुग्णवाहिका न मिळू शकल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.

Family members mourn as outrage grows over BJP leader Om Prakash Gupta’s death due to ambulance delay in Uttar Pradesh.
भारताच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री, २ दिवसांत झाले ५० लाख सदस्य; कोण आहे संस्थापक?

या घटनेमुळे उत्तरप्रदेशमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवनरक्षक प्रणाली रुग्णवाहिकेचे प्रभारी, बसुदेव पांडे यांनी सांगितले की, महाविद्यालयाकडे एकूण सहा रुग्णवाहिका आहेत. यापैकी दोन रुग्णवाहिका सामुदायिक आरोग्य केंद्राच्या असून उर्वरित चार रुग्णवाहिका संपूर्ण जिल्ह्याचे काम पाहतात. एकाचवेळी अनेक आपत्कालीन परिस्थितीत उद्भवतात, त्यावेळी अशी समस्या निर्माण होते, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Family members mourn as outrage grows over BJP leader Om Prakash Gupta’s death due to ambulance delay in Uttar Pradesh.
Headlines | सकाळी 7 वाजताच्या हेडलाईन्स : 28 March 2024 | SAAM TV | Marathi News | Marathi News

ओम प्रकास गुप्ता यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून भाजपच्या अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच गावामध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com