Shivali Parab Bought New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab : 'छोटस गिफ्ट माझ्या वाढदिवसानिमित्त आई बाबांसाठी...'; वाढदिवशी केला नव्या घरात गृहप्रवेश, शिवाली परबने केला व्हिडीओ शेअर

Shivali Parab Bought New Home : शिवालीने तिच्या वाढदिवशी नव्या घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे. अभिनेत्रीचा वाढदिवस १० मे ला असतो. त्यादिवशी तिच्या घराची पूजा होती.

Chetan Bodke

हास्यजत्रा फेम शिवाली परब हिला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच शिवालीच्या अभिनयाची आणि तिच्या कॉमेडीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. शिवालीने तिच्या वाढदिवशी नव्या घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे. अभिनेत्रीचा वाढदिवस १० मे ला असतो. त्यादिवशी तिच्या घराची पूजा होती. अभिनेत्रीने पूजा दरम्यानचा एक व्हिडीओ कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

अभिनेत्री आपल्या कॅप्शनमध्ये म्हणाली की, "नमस्कार पाहिले तर सगळ्यांना खूप- खूप धन्यवाद माझ्या वाढदिवसानिमित्त कॉल आणि मेसेज करून शुभेच्छा दिल्यात असाच तुम्हा सगळ्यांचा आशिर्वाद राहूदे आणि या आशिर्वादामुळे मी अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी माझ्या आई बाबांसाठी स्वतचं, हक्काचं एक घर घेतलं... माझ्या वाढदिवशी घरात गृहप्रवेश झाला, माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाच स्वप्न असतं म्हणजे स्वःतच एक “घर” खरं तर हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांच स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही..."

पुढे पोस्टमध्ये शिवालीने लिहिलंय की, "माझं छोटस गिफ्ट माझ्या वाढदिवसानिमित्त आई बाबांसाठी... इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या बिल्डिंगच्या 2BHK अपार्टमेंटपर्यंतचा होता... प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता सगळ्यांचे खूप आभार माझ्यासोबत तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम असुद्या... हा व्हिडिओ यासाठी टाकतेय कारण आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा... व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आले आहे, काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे... सर्वांचे मनापासून आभार..."

अभिनेत्रीने नवं घर खरेदी करणार म्हटल्यावर शिवालीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्यावर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ हे वर्ष अनेक मराठी सेलिब्रिटींसाठी खास ठरलेलं आहे. अनेकांनी नवीन घर आणि कार खरेदी केलेली आहे. त्या यादीमध्ये आता शिवाली परबचेही नाव सामील झाले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये तिने काम केले होते. 'चंद्रमुखी' चित्रपटामधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यासोबतच तिचे काही साँग्जही रिलीज झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT