Gaurav More Quit MHJ Show : 'सांगताना खूप वाईट वाटतंय की मी...'; गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली

Gaurav More Quit Maharashtrachi Hasyajatra Show : अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली आहे. अभिनेत्याने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
Gaurav More Quit MHJ Show
Gaurav More Quit MHJ ShowSaam Tv

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने अभिनेता गौरव मोरेला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी दिली आहे. ‘गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ त्याच्या ह्या हटक्या डायलॉगने गौरव मोरेला विशेष ओळख दिली आहे. ज्या शोने गौरवला प्रसिद्धी दिली आहे, तो शो त्याने सोडला आहे. याबद्दलचे वृत्त त्याने स्वत: इन्स्टाग्रामवरून दिले आहे. गौरवने अवघ्या काही मिनिटांपूर्वीच ही पोस्ट शेअर केलेली आहे.

Gaurav More Quit MHJ Show
Kangana Ranaut : अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर कंगना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत चांगलंच सुनावलं

गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, " Hello everyone i am a gaurav more from powai filter pada Ta na na na na naaaaaa आरा बाप मारतो का काय मी… ये बच्ची... रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहे. मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.

"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे" गौरव मोरेचीही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gaurav More Quit MHJ Show
Renuka Shahane Post : "....तर त्यांना मत देऊ नका"; 'नोकरीत मराठी माणूस नको'च्या पोस्टनंतर रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

अभिनेत्याने प्रेक्षकांच्या ह्या आवडत्या शोमधून एक्झिट घेतल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. अनेकांनी त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. गौरव मोरेच्या ह्या पोस्टवर अभिनय बेर्डे, समीर चौघुलेसह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हास्यजत्रेत दिसत नव्हता. त्याने एका मुलाखतीत , तो आजारी असल्याचं सांगितलं होतं. बरा झाल्यानंतर तो लवकरच शोमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर गौरव सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Gaurav More Quit MHJ Show
Deepika Padukone Flaunt Baby Bump : दीपिका पदुकोणचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, अभिनेत्रीचा अनसीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गौरव मोरे हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. गौरव हास्यजत्रेव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गौरव मोरे गेल्यावर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे. सध्या गौरव सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

Gaurav More Quit MHJ Show
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com