Deepika Padukone Flaunt Baby Bump : दीपिका पदुकोणचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, अभिनेत्रीचा अनसीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Unseen Pic Of Deepika Flaunting Baby Bump : दीपिका पदुकोणचा पहिल्यांदाच बेबी बंप दाखवताना स्पॉट झालेली आहे. सध्या अभिनेत्री रणवीरसोबत आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Unseen Pic Of Deepika Flaunting Baby Bump
Unseen Pic Of Deepika Flaunting Baby BumpInstagram

बॉलिवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात. या कपलने गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. अभिनेत्री सप्टेंबर २०२४ मध्ये गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सध्या अभिनेत्री स्वत:ला सर्वाधिक वेळ देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रणवीरसोबत आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातच अभिनेत्रीचा बेबीबंप दिसणारा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

Unseen Pic Of Deepika Flaunting Baby Bump
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

अभिनेत्रीच्या प्रेग्नेंट असल्याचे वृत्त आल्यापासून अभिनेत्री चर्चेत आहे. दीपिका बेबीबंपवर कधीही स्पॉट झालेली नव्हती. पहिल्यांदाच अभिनेत्री बेबीबंपमध्ये स्पॉट झालेली आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका- रणवीरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कपल जहाजातून उतरताना दिसत आहे. यावेळी दीपिकाने कम्फर्टेबल टी- शर्ट आणि जीन्स तर रणवीरने व्हाईट टी-शर्ट आणि पँट सोबतच शूज असा लूक केलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाचं बेबी बंप पाहायला मिळत आहे. दीपिका- रणवीरचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर "butterscotchbusy" नावाच्या अकाऊंटवरून व्हायरल होत आहे. (Viral Photos)

सध्या जगभरातले सर्व सेलिब्रिटी 'मेट गाला २०२४' या फॅशन अवॉर्डमध्ये व्यग्र आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या अवॉर्ड फंक्शनला उपस्थिती लावणार आहेत. 'मेट गाला २०२४'च्या पहिल्या दिवशीच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि उद्योजिका ईशा अंबानीनेही उपस्थिती लावली होती. अभिनेत्री लवकरच आई होणार असल्यामुळे ती यावर्षी फॅशन इव्हेंटमध्ये हजर राहू शकली नाही. सध्या दीपिकावर सोशल मीडियावरून चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Unseen Pic Of Deepika Flaunting Baby Bump
Meta Gala 2024 : १६३ कारागीर, १९६५ तास...; मेट गालामध्ये आलिया भट्टची रॉयल एन्ट्री, हटके साडीची जगभर चर्चा

दीपिका पदुकोणच्या कामाविषयी बोलायचे तर, दीपिका शेवटची 'फायटर' चित्रपटामध्ये दिसलेली होती. आता लवकरच दीपिका 'कल्की 2898' या चित्रपटातून टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. त्यासोबतच 'लव्ह 4 एव्हर' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटातून ती चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच दीपिकाचा 'सिंघम अगेन' चित्रपटातील पोलिसाच्या भूमिकेतील लूक व्हायरल झाला होता.

Unseen Pic Of Deepika Flaunting Baby Bump
Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com