Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Shekhar Suman latest News : शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलगा अध्ययनची एक्स-गर्लफ्रेंड कंकना रणौतचा प्रचार करावा लागणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?
Shekhar SumanSaam tv
Published On

मुंबई : बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेखर सुमन यांनी पक्षप्रवेश केला. शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलगा अध्ययनची एक्स-गर्लफ्रेंड कंकना रणौतचा प्रचार करावा लागणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

कंगना रणौत सध्या हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या लोकसभा मतदारसंघातून कंगना यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. काल कंगनाने निवडणूक जिंकल्यास पूर्ण वेळ राजकारणाला देईल, त्यानंतर बॉलिवूडपासून दूर राहील. याचदरम्यान, शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शेखर सुमन हे कंगनाचा प्रचार करणार का, असे प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारू लागले आहेत.

काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते निवडणूक

शेखर सुमन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटणा लोकसभा मतदारसंघातून २००९ मधून निवडणूक लढले होते. त्यावेळी त्या मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात शेखर सुमन यांनी निवडणूक लढली होती. मात्र, त्यावेळी शेखर सुमन यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

शेखर सुमन काय म्हणाले?

भाजप प्रवेश केल्यावर शेखर सुमन केल्यावर काय म्हणाले, 'मला माहिती नव्हतं की, मी या ठिकाणी बसणार आहे. आयुष्यात अनेक न आवडणाऱ्या घटना घडतात. मी या ठिकाणी खूप सकारात्मक विचाराने आलो आहे. मी ईश्वराचे आभार मानतो, त्यांच्या आदेशामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला'.

कंगना आणि अध्ययन यांच्या नात्यात दुरावा?

मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने त्याच्या ब्रेकअपविषयी भरभरून बोलला होता. 'मी त्या व्यक्तिविषयी बोलू इच्छित नाही, ज्यांचा तुम्ही विचार करत आहात. आता जुन्या गोष्टी विसरून गेलो आहे. मी आता बोलणं बंद केलं आहे. आता आयुष्य खूप पुढे गेलं आहे. तेव्हा मी २२ वर्षांचा होतो, आता ३६ वर्षांचा झालो आहे', असं अध्ययन म्हटला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com