आज बॉलिवूडच्या मस्तानीचा म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जितकी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते तितकीच ती आपल्या अभिनयासाठीही चर्चेत असते. दीपिका फक्त अभिनयातच नाही तर, मॉडेलिंग आणि खेळातही फार माहिर आहे. तिने बॅडमिंटन खेळामध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळून आली आहे. आज आपण मस्तानीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सिनेकारकिर्दिबद्दल जाणून घेणार आहोत...
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज (५ जानेवारी) ३८ वा वाढदिवस आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोणची ती लेक आहे. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने खेळातही आपले नशीब आजमावले. दीपिका पदुकोण बॅडमिंटन खेळामध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळून आली आहे. सोबतच दीपिकाने मॉडेलिंगमध्येही नाव कमावले. तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू करताच तिला लोकप्रियता मिळाली. दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. दीपिका पदुकोणच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉईंट चित्रपट ठरलेय.
२०१३ मध्ये, थिएटरमध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. त्या चित्रपटामध्ये आमिर खान, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. तो चित्रपट आधी दीपिका पादुकोणला ऑफर करण्यात आला होता पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
त्यानंतर तो चित्रपट कतरिना कैफला मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर त्याची तुफान चर्चा रंगली. 'चेन्नई एक्सप्रेस'मधील मीना लोचानी या भूमिकेसाठी रोहित शेट्टीची पहिली पसंती कतरिना कैफ होती.
'जब तक है जान'मध्ये शाहरुख खानसोबत कतरिनाची हिट जोडी जमल्यानंतर रोहितला तिला आपल्या चित्रपटात कास्ट करायचे होते, पण अभिनेत्रीने ही ऑफर नाकारली. त्यानंतर रोहितने त्या चित्रपटात दीपिका पदुकोणला कास्ट करण्याचे ठरवले. फक्त किंग खानचीच नाही तर, तिची भूमिकाही चाहत्यांना फारच भावली.
'ये जवानी है दिवानी'मधील दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र, या चित्रपटासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जीची पहिली पसंती कतरिना कैफ होती. पण कॅटने तो चित्रपटही नाकारला. त्यासोबतच,संजय लीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी'या चित्रपटामध्ये, चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीने अफलातून अभिनय केला होता. दरम्यान चित्रपटामध्ये संजय लीला भन्साळी यांना कतरिना कैफला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे होते. पण काही कारणास्तव चित्रपट तिने नाकारला आणि दीपिकाला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे दीपिकाला बॉलिवूडची मस्तानी म्हणून खरी ओळख मिळाली.
'गोलियों की रासलीला: राम लीला' या चित्रपटासाठी पूर्वी करीना कपूरला विचारण्यात आले होते. पण शुटिंगच्या काही दिवस आधीच करीनाला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि दीपिका पदुकोणला चित्रपटामध्ये ऑफर मिळाली. खरंतर, दीपिका पदुकोणचा बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याचा काही साधा प्रवास नव्हता. तिने शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' चित्रपटामधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केला आहे. तुम्हाला माहीत नसेल पण दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळीच्या ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसली असती, पण ‘सावरिया’ चित्रपटाची ऑफर सोनम कपूरकडे गेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.