...वाघालाही फाडतो हा 'शिवरायांचा छावा', चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट, संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला 'हा' अभिनेता

Shivrayancha Chhava Teaser Out: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Shivrayancha Chhava Teaser
Shivrayancha Chhava TeaserSaam Tv
Published On

Shivrayancha Chhava Movie:

२०२३ या वर्षात मराठी सिनेरसिकांना अनेक जबरदस्त कंटेट असलेल्या मराठी चित्रपटांची खास मेजवानी मिळाली. आता २०२४ हे नवं वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात देखील मराठी सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी अनेक चित्रपट भेटीला येणार आहेत. 'ओले आले', 'सत्यशोधक' आणि 'पंचक' आणि खुर्ची हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटापाठोपाठ आणखी एक चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली होती. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेत नेमका कोण अभिनेता आहे असा प्रश्न सर्वांना पडला होता. या चित्रपटाच्या टीझरची सर्वजण वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. या चित्रपटाचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.

नुकताच दिग्दपाल लांजेकर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेता भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार या प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या टीझर मधील अभिनेत्याचा लूक खूपच जबरदस्त आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे की, टीझरची सुरुवात घनदाट जंगलातून होते. त्यानंतर एक भलामोठा वाघ दिसतो. त्या वाघाच्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण पाटील उभा राहिलेला दिसत आहे. यावेळी वाघ संभाजी महाराजांवर हल्ला करतो. त्यानंतर या दोघांमध्ये झुंज झाल्याचे दिसत आहे. शेवटी संभाजी राजे वाघाला शेपटीला धरून फटफटत घेऊन जाताना दिसत आहेत.

Shivrayancha Chhava Teaser
Horror Movie: भारतातील ३ चित्रपट पाहून झालाय लोकांचा मृत्यू, तुम्हाला महितीयेत का 'ते' सिनेमे?

दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कोण शत्रू यावरी, करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा 'शिवरायांचा छावा'. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील.' शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ते सोशल मीडियावर कमेंट्स करत कौतुक करत आहेत. दरम्यान, दिग्पाल लांजेकर यांच्या शिवरायांचा छावा या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुता दिसत आहे. ते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

Shivrayancha Chhava Teaser
Janhvi Kapoor: 'मी तुझे ब्युटी स्पॉट...', जान्हवी कपूरला बॉलिवूड अभिनेत्याकडून आला होता फ्लर्टी मेसेज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com