भारतीय सिनेसृष्टीत (Indian Film Industry) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक चित्रपट तयार केले जातात. काही चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, काही प्रेक्षकांना खळखळवून हसवतात, तर काही चित्रपट असे आहेत की जे पाहून प्रेक्षकांना भीती वाटल्याशिवाय राहत नाही.
भारतामध्ये असे अनेक हॉरर चित्रपट (Horror Movie) तयार करण्यात आले आहेत. यामधील ३ चित्रपट असे आहेत की ते पाहून प्रेक्षकांचा मृत्यू झाला आहे. या चित्रपटांमध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट नेमके कोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत...
२००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'भूत' चित्रपट हा बॉलिवूडमधील सर्वात खतरनाक चित्रपटांच्या यादीमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटामध्ये उर्मिला मातोंडकर, अजय देवगण, नाना पाटेकर, फरदीन खान, रेखा आणि तनुजा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. या चित्रपटामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या एका थिएटरमध्ये जेव्हा सकाळी क्लिनिंग स्टाफ स्वच्छता करायला गेला. तेव्हा त्यांना त्याठिकाणी एका ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीने आदल्या दिवशी रात्री 'भूत' चित्रपटाचा शेवटचा शो पाहिला होता. राम गोपाल वर्मा यांनी हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सांगितले होते की, चित्रपट पाहिल्यानंतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगी तरंगा' हा मिस्ट्री थ्रिलर हॉरर चित्रपट ऑस्करपर्यंत पोहचला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप भंडारी यांनी केले होते. हा त्यांचा पहिलाच चित्रट होता. साईकुमार आणि अरविंद रावसोबत निरूप भंडारी, राधिका चेतन आणि अवंतिका शेट्टी हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. रंगी तरंगा हा एक रोमँटिक थ्रिलर आहे.
बंगळुरूमधील एका थिएटरमध्ये एक इंजिनिअर आपल्या पत्नीसोबत 'रंगी तरंगा' चित्रपट पाहत होता. त्याचवेळी हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने सांगितले की, माझा पती अचानक बेशुद्ध पडला. जेव्हा मी त्याला हालवले तेव्हा त्याने काहीच हालचाल केली नाही. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.'
'राजू गारी गाडी' हा एक हॉरर चित्रपट आहे. २०१९ मध्ये हा तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला होता. कमी बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अश्विन बाबू, अविका गोर, अली, उर्वशी, ब्रह्माजी आणि हरि तेजा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ओमकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण हा चित्रपट पाहताना ५५ वर्षांच्या व्यक्तीला थिएटरमध्ये हार्ट अटॅक आला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ लाखांची मदत देण्यात आली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.