Ankita Lokhande And Vicky Jain
Ankita Lokhande And Vicky JainSaam Tv

Bigg Boss 17: 'हिला फक्त तोंड चालवायला येतं', बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन होताच अंकिता लोखंडेला असं का म्हणाला विकी जैन?

Ankita Lokhande Fight With Vicky Jain: कॅप्टन झाल्यानंतर अंकिता आणि विकीमध्ये पुन्हा वाद झाला आहे. अंकिताने विकीला आदर करण्यास सांगते. यावरून विकी चिडतो आणि त्यांच्यात वाद होतो.

Bigg Boss 17 New Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' च्या (Bigg Boss 17) घरात चर्चेत असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन झाली आहे. अंकिताने नुकताच कॅप्टन पदाची जबाबदारी स्वीकारली. अंकिता घराची कॅप्टन झाल्यामुळे घरातील काही सदस्यांना चांगलाच आनंद झाला. तर काही सदस्य नाराज झाल्याचे दिसून येत आहे. अशामध्येच कॅप्टन झाल्यानंतर अंकिता आणि विकीमध्ये पुन्हा वाद झाला आहे. अंकिताने विकीला आदर करण्यास सांगते, यावरून विकी चिडतो आणि त्यांच्यात वाद होतो.

'बिग बॉस 17'चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिता आणि विकीचा वाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये खळबळ उडणार असल्याचे दिसून येते. जेव्हा अंकिता तिचा नवरा विकी जैनला कॅप्टनचा आदर करण्यास सांगते. तेव्हा विकी तिला मागे फिरून म्हणतो की, हे कॅप्टनच्या वागण्यावर अवलंबून असते. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो. रागाच्या भरात अंकिता विक्कीला 'गाढव' आणि 'जळक्या' असे म्हणते. तर विकी देखील तिला उत्तर देतो की. 'अंकिताला फक्त तोंड चालवायला येते. आली मोठी कॅप्टन.'

अंकिताच्या बुद्धिमत्तेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिचं बिग बॉसच्या घरात कौतुक होत आहे. तिला लक्झरी रूम ऍक्सेस आणि टास्क असाइनमेंटमध्ये अधिकार यासारख्या विशेष अधिकारांच्या सोबतीने कॅप्टनपद मिळाले. अंकिता घराची कॅप्टन झाल्यानंतर तिचा पती विकी, ईशा मालवीय आणि नील भट्ट यांनी एकच जल्लोष केला. तर इतर स्पर्धकांनी ऑन-कॅमेरा टिप्पण्यांद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली.

Ankita Lokhande And Vicky Jain
Ajantha Verul Film Festival: हिरो आणि व्हीलन ठरवताना दिग्दर्शकांसमोर निर्माण होतो मोठा पेच; जावेद अख्तर असं का म्हणाले?

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन या कपलने बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री केली. बिग बॉसच्या घराबाहेर आनंदी आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणारे हे कपल बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर सतत वाद करताना दिसत आहे. सतत अंकिता आणि वकी यांच्यात भांडणं होत आहेत. त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या हे कपल बिग बॉसच्या घरातील सर्वांचे आवडते कपल आहे.

Ankita Lokhande And Vicky Jain
Neha Pendse: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी ६ लाखांची चोरी, नोकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com