Ajantha Verul Film Festival: हिरो आणि व्हीलन ठरवताना दिग्दर्शकांसमोर निर्माण होतो मोठा पेच; जावेद अख्तर असं का म्हणाले?

Javed Akhtar Big Statement: या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार आणि पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
Javed Akhtar
Javed AkhtarSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar:

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Ajantha Verul International Film Festival) ३ जानेवारीपासून सुरूवात झाली. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मारठवड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये जगभरातील ५५ चित्रपटांची मेजवाणी सिनेरसिकांना मिळणार आहे. या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार आणि पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. जावेद अख्तर यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुरस्कार स्वीकारल्यानंतर जावेद अख्तर यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. यावेळी, 'पूर्वीच्या काळात हिरो कोण आणि व्हीलन कोण आहे. याबद्दल समाजाची भूमिका स्पष्ट होती. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये समाजाचीच भूमिका संभ्रमित असल्यामुळे हिरो कोण असायला पाहिजे हा दिग्दर्शकांसमोर मोठा पेच आहे.', असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. तसंच यावेळी बोलताना त्यांनी 'मन की बात'वर आपली भूमिका सांगितली.

Javed Akhtar
Khurchi Trailer: हवा नाही वादळ येणार..., 'खुर्ची'चा धमाकेदार ट्रेलर; १२ जानेवारीला चित्रपट येतोय भेटीला

छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात झाले. यावेळी दिग्दर्शक अनुभव सिन्हा, एनएफडीसीच्या वरिष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्म सिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थित होती.

Javed Akhtar
Ira Khan- Nupur Shikhare Wedding: नुपूर शिखरेची बायको झाली आयरा खान, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील कार्यक्रम -

- ४ जानेवारी २०२४ - दुपारी २ वाजता आयनॉक्स येथे 'पा', 'चिनी कम', 'घुमर', 'शामीताभ', 'पॅडमॅन' या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- ४ जानेवारी २०२४ - सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार आणि संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासोबत संवाद साधतील.

- ५ जानेवारी २०२४ - दुपारी २ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे 'आर्टिकल १५', 'थप्पड', 'रा-वन', 'मुल्क' या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Javed Akhtar
Aamir Khan And Kiran Khan Dance Video: लेकीच्या लग्नात बेभान होऊन नाचला आमिर खान; एक्स वाइफसोबत केला भन्नाट डान्स

- ६ जानेवारी २०२४ - दुपारी २.३० वाजता केंद्र शासन-पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांच्या गांधी आणि सिनेमा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- ६ जानेवारी २०२४ - सायंकाळी ६.३० वाजता मीट द डिरेक्टर्स या सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल

- ७ जानेवारी २०२४ - दुपारी १२ वाजता ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री.चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

Javed Akhtar
Aamir Khan Kiss Kiran Rao: मुलीच्या लग्नात आमिर खानने एक्स वाइफ किरण रावला केलं किस, पाहत राहिले सर्वजण; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com