Salman Khan: 'द बुल'साठी मेहनत घेतोय सलमान खान, डाएटमध्ये बदल करत साडेतीन तासांची घेतोय ट्रेनिंग
Actor Salman Khan Fitness:
बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३' चित्रपट (Tiger 3 Movie) सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. २०२४ मध्ये देखील सलमान खानला नव्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशामध्ये एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खानच्या 'द बुल'ची (The Bull Movie) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी सलमान खान खूपच मेहनत करताना दिसत आहे.
सलमान खानच्या वाढदिवशी प्रोड्युसर करण जोहरने (Karan Johar) सांगितले होते की, २५ वर्षांनंतर सलमान खानसोबत पुन्हा काम करत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणारा 'द बुल' चित्रपटामध्ये सलमान खान एका वेगळ्याच रुपामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीमने २९ डिसेंबरला मुंबईमध्ये शूटिंगला सुरूवात केली.
या चित्रपटासाठी सलमान खानने फिटनेस ट्रेनिंग देखील सुरू केली आहे. सध्या सलमान खान पॅरामिलिट्री फोर्सेससोबत ट्रेनिंग घेत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान पॅरामिलिट्री ऑफिसरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अशामध्ये चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, सलमान खान ही भूमिका साकारण्यासाठी ट्रेनिंगमध्ये कोणतीही कमी पडून देत नाहीये.
या चित्रपटाशी संबंधित एका सुत्राने सांगितले की, सलमान खान या चित्रपटामध्ये ब्रिगेडियर फारुख बुल्सारा यांची भूमिका साकारणार आहे. फारुख बुल्सारा यांनी १९८८ मध्ये मालदीवमध्ये ऑपरेशन कॅप्टनचे नेतृत्व केले होते. सलमान खान या चित्रपटामध्ये पॅरामिलिट्री अधिकारी असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
या चित्रपटामध्ये ब्रिगेडियर फारुख बुल्सारा यांची भूमिका साकारण्यासाठी सलमान खानला फिजिकल ट्रेनिंग घ्यावी लागत आहे. या भूमिकेमध्ये पूर्णपणे फिट दिसण्यासाठी सलमान खान दिवसाला साडेतीन तासांची ट्रेनिंग घेत आहे. सुत्रांनी हे देखील सांगितले की, सलमान खानने ही भूमिका साकारण्यासाठी आपल्या डाएटमध्ये बदल देखील केला आहे.
दरम्यान, विष्णू वर्धन दिग्दर्शित 'द बुल' चित्रपटात ऑपरेशन कॅक्टसची कथा मांडण्यात येणार आहे. व्यापारी अब्दुल्ला लुथुफी आणि पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तामिळ इलम (PLOT) यांच्या नेतृत्वाखाली सत्तापालटाचा प्रयत्न झाला. तेव्हा भारतीय सशस्त्र दलांनी 3 नोव्हेंबर 1988 रोजी मालदीवला मदत केली होती. भारतीय सैन्याने कुशलतेने अनेक सैनिकांना ठार केले आणि काही तासांतच राष्ट्राध्यक्ष मौमून अब्दुल गयूम यांच्या सरकारवर नियंत्रण मिळवले. 'द बुल' हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.