Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; बेबीबंपचा फोटो पाहून नेटकरी म्हणाला - 'आधी प्रग्नेंसी नंतर लग्न'

Amala Paul Pregnancy Photoshoot: अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अमला पॉलने पतीसोबत प्रग्नेंसी फोटोशूट करत बेबीबंप फ्लॉन्ट केला आहे. तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
Amala Paul Pregnancy Photoshoot
Amala Paul Pregnancy PhotoshootSaam Tv
Published On

Amala Paul Pregnancy:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलने (Amla Paul) काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड जगत जोशीसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या दोन महिन्यांनंतर या अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अमला पॉलने पतीसोबत प्रग्नेंसी फोटोशूट करत बेबीबंप फ्लॉन्ट केला आहे. तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

साऊथची 32 वर्षीय अभिनेत्री अमला पॉलने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रग्नेंसी फोटोशूट शेअर करत गुड न्यूज शेअर केली. हे फोटो पोस्ट करत लवकरच आई होणार असल्याची घोषणा अमलाने केली. पण साऊथच्या अभिनेत्रीची ही गुड न्यूज लोकांना समजू शकलेली नाही. कारण 5 जानेवारीला अभिनेत्रीच्या लग्नाला दोन महिने होत आहेत. दोन महिन्यातच अभिनेत्री आई होणार असल्याची घोषणा करत असल्यामुळे नेटिझन्स सध्या आश्चर्य व्यक्त करत कमेंट्स करत आहेत.

अमला पॉलने प्रेग्नेंसीचे फोटो इन्स्टावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की 'आता मला कळाले की तुझ्यासोबत 1 +1 चा अर्थ 3 होतो.' अमलाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेत्री काजल अग्रवालने कमेंट्स करत,'तुम्हा दोघांना खूप-खूप शुभेच्छा. खूप प्रेम आणि आशीर्वाद.', असे लिहिले आहे.

अमला पॉलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'आधी प्रग्नेंसी कन्फर्म करायचे आणि नंतर लग्न करायचे. आजकाल हेच चालले आहे' दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'तुम्ही तर काही महिन्यांपूर्वीच लग्न केले होते ना.' तर तिसऱ्या युजरने लिहिले की, 'ऐवढ्या लवकर कसे?' अशाप्रकारच्या शॉकिंग कमेंट्स नेटिझन्स करत आहेत.

दरम्यान, अमला पॉल मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधात अडकली. अमाला पॉलने तिचा बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत गुपचूप लग्न केले होते. कोची बोलगट्टी येथे या कपलचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. कोचीमध्ये या कपलने लव्हेंडर थीमवर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले होते. अमालाच्या लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अमालाने तमिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमाला पॉलने या वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Amala Paul Pregnancy Photoshoot
Bigg Boss 17: 'हिला फक्त तोंड चालवायला येतं', बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन होताच अंकिता लोखंडेला असं का म्हणाला विकी जैन?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com