अंगावर बँडेज अन् तीक्ष्ण नजर..., बिग बी बच्चन यांचा 'अश्वत्थामा'चा लूक रिलीज; 'Kalki 2898 AD'ची चर्चा

Kalki 2898 AD Teaser: नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'ची जोरदार चर्चा होत आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये बिग बी बच्चन यांचा अफलातून लूक पाहायला मिळत आहे.
Kalki 2898 AD Ashwathama Look
Kalki 2898 AD Ashwathama LookInstagram

Kalki 2898 AD Ashwathama Look

नाग अश्विन दिग्दर्शित (Director Nag Ashwin) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) सह अनेक दिग्गज सेलिब्रिटी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सध्या ह्या बिग बजेट चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नुकताच चित्रपटाचा एक टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. यामध्ये बिग बी बच्चन यांचा अफलातून लूक पाहायला मिळत आहे.

Kalki 2898 AD Ashwathama Look
Chris King Dies : प्रसिद्ध रॅपरचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन, चाहत्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर

सध्या सोशल मीडियावर ह्या टीझरची जोरदार चर्चा होत आहे. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर हा टीझर शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये, अमिताभ यांचे संपूर्ण शरीर बँडेजने झाकलेले पाहायला मिळत आहे. त्यासोबतच त्यांचा चेहरा देखील बँडेजने गुंडाळलेला दिसत आहे. यामध्ये फक्त त्यांचे डोळेच पाहायला मिळत आहेत. (Bollywood News)

कपाळावर टीळा आणि वाढलेली दाढी असा लूक बिग बींचा चित्रपटात आहे. बिग बी चित्रपटामध्ये अश्वथामाचे पात्र साकारत आहे. त्यामध्ये ते शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहेत. तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, 'हाय...मी राया आहे.'

यानंतर तो अमिताभ बच्चन यांना त्रास देताना दिसत आहे. पुढे तो मुलगा म्हणतो, 'तू देव आहेस?' अमिताभ म्हणतात, 'आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.' त्यांनी शनिवारी, (२० एप्रिल) "समय आ गया है" असं कॅप्शन देत एक फोटोही शेअर केला. (Bollywood Film)

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांचा चित्रपटातला फर्स्ट लूक शेअर करताना कॅप्शन दिले की, 'हा असा अनुभव मला यापूर्वी केव्हाच आला नव्हता.' सध्या अमिताभ यांच्या या लूकची सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा भीतीदायक आणि रागीट वाटणाऱ्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ह्या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती ६०० कोटींच्या आसपास केलेली आहे. हा मेगाबजेट चित्रपट मे २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. कदाचित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळातच हा चित्रपट रिलीज होत आहे. (Entertainment News)

Kalki 2898 AD Ashwathama Look
Sumeet Raghavan Birthday: मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुमित राघवनबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com