Sumeet Raghavan Birthday: मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुमित राघवनबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Sumeet Raghavan News: हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सुमीत राघवनचा आज (२२ एप्रिल) वाढदिवस आहे. अभिनेता ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
Sumeet Raghavan Birthday
Sumeet Raghavan BirthdaySaam Tv

Sumeet Raghavan Birthday

हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सुमीत राघवनचा (Sumeet Raghavan) आज (२२ एप्रिल) वाढदिवस आहे. अभिनेता आज आपल्या परिवारासोबत ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुमीत राघवन दक्षिण भारतीय कुटुंबातून तो येतो. पण असं असलं तरीही त्याची मराठी भाषेवर उत्तम पकड आहे. सुमीतचे बाबा तामिळ, तर आई कानडी असली तरीही मराठी सिनेसृष्टीमध्ये त्याच्या अभिनयाची खास चर्चा होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुमीतने चित्रपट विश्वचं नाही तर, मालिका आणि नाट्यक्षेत्रही गाजवले आहे. (Actor)

Sumeet Raghavan Birthday
Marathi Serial TRP List : 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला; 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये चुरशीची लढत, जाणून घ्या कोण आहे टॉपवर ?

२२ एप्रिल १९७१ रोजी मुंबईमध्ये सुमीत राघवनचा जन्म झालेला आहे. तामिळ कुटुंबात जन्मलेल्या सुमीतला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फास्टर फेणे' या मालिकेच्या माध्यमातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. पण असं असलं तरीही, बीआर चोप्रा दिग्दर्शित 'महाभारत' या पौराणिक मालिकेतून सुमीतला फार लहान वयात प्रसिद्धी दिली. त्या मालिकेत सुमीतने भगवान कृष्णाचा सर्वात चांगला मित्र सुदामा याची भूमिका त्याने साकारली होती. त्यासोबतच 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेनेही अभिनेत्याला प्रसिद्धी दिली. (Television Actor)

Sumeet Raghavan Birthday
Chinmay Mandlekar News : 'इथून पुढे मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही', चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

सुमीतला बालपणापासूनच गायनाची आवड होती. अभिनयासोबतच सुमीत गाणी आणि गझलांमध्येही त्याने प्रसिद्धी मिळवली. त्यासोबतच सुमीत डबिंग क्षेत्रातही माहीर आहे. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका आणि रिॲलिटीशोमधून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. सुमीतने ‘ब्ल्यू स्ट्रीक’, ‘शांघाई नून’, ‘रश हवर’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’, ‘शांघाई नाईट्स’ या हॉलिवूड चित्रपटातील पात्रांना आपला आवाज दिला आहे. (Entertainment News)

Sumeet Raghavan Birthday
Shubhankar And Amruta Wedding: ‘कन्यादान’ फेम वृंदा आणि राणाने रिअल लाइफमध्ये बांधली लग्नगाठ; अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न, पाहा Photos

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com