Chinmay Mandlekar News : 'इथून पुढे मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही', चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

Chinmay Mandlekar Video: अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या ‘जहांगीर’ या नावावरून प्रचंड ट्रोल करीत आहेत. चिन्मयने व्हिडीओ शेअर करत छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Chinmay Mandlekar
Chinmay Mandlekar NewsInstagram
Published On

Chinmay Mandlekar News

अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सध्या नेटकरी अभिनेत्याला त्याच्या मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोल करीत आहेत. अभिनेत्याने त्याच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असं ठेवलं आहे. यामुळे त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे. याबद्दल चिन्मय आणि त्याच्या पत्नीने शनिवारी (२० जानेवारी) व्हिडीओ शेअर करत त्याच्या पत्नीने नावाचा अर्थ आणि कारण सांगत नेटकऱ्यांना योग्य ते स्पष्टीकरण दिलं. नेटकऱ्यांनी हा वाद थेट महाराजांच्या भूमिकेशी जोडल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात चिन्मयने मोठा निर्णय घेतला आहे.

Chinmay Mandlekar
Shubhankar And Amruta Wedding: ‘कन्यादान’ फेम वृंदा आणि राणाने रिअल लाइफमध्ये बांधली लग्नगाठ; अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न, पाहा Photos

चिन्मयने व्हिडीओ शेअर करत हा निर्णय सांगितला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्याने यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. चिन्मयने हा व्हिडीओ शेअर करताना, "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो..." असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेता व्हिडीओमध्ये म्हणतो की, "नमस्कार, व्यवसायाने मी एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या ‘जहांगीर’ नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा होता. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे."

"मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधी बऱ्याचदा बोललो आहे, तर त्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी बोलून वेळ वाया घालवत नाही. मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती भूमिका मी साकारली आहे. तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.", असंही चिन्मय म्हणाला.

Chinmay Mandlekar
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Wedding Anniversary : ऐश्वर्या- अभिषेकने सेलिब्रेट केला लग्नाचा १७ वा वाढदिवस; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समोर आला फॅमिलीचा नवा फोटो

"माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला आज तो ११ वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या आणि देशभरातील लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम या भूमिकेने मला दिलं आहे. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात, मी तिथे महाराजांची मूर्ती ठेवली आहे. हा दिखावा नाहीये प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचं स्पष्टीकरण देणार नाही"

Chinmay Mandlekar
Utkarsh Shinde Post: "कोरस देणारा ते शिंदेशाही ब्रँडचा बादशहा..."; उत्कर्ष शिंदेची वडील आनंद शिंदेंसाठीची खास पोस्ट चर्चेत

"नाव खटकतंय म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिला. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा)..." असं चिन्मय व्हिडीओमध्ये म्हणाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

Chinmay Mandlekar
Ravi Kishan: भाजप खासदार रवी किशन माझे जैविक वडील; मुंबईच्या तरूणीचा खळबळजनक दावा, डीएनए चाचणीची केली मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com