Shubhankar And Amruta Wedding: ‘कन्यादान’ फेम वृंदा आणि राणाने रिअल लाइफमध्ये बांधली लग्नगाठ; अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न, पाहा Photos

Amruta Bane and Shubhankar Ekbote: रिल लाईफमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अमृता आणि शुभंकरने रिअल लाईफमध्येही लग्नगाठ बांधली आहे. कपलच्या लग्नातील फोटोज् इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.
Amruta Bane and Shubhankar Ekbote Wedding
Amruta Bane and Shubhankar Ekbote WeddingInstagram

Amruta Bane and Shubhankar Ekbote Wedding

सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरूवात करीत आहे. गौतमी देशपांडे, शिवानी सुर्वे, पूजा सावंत, तितीक्षा तावडे आणि योगिता चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. आता या यादीमध्ये आणखी एका सेलिब्रिटी कपलचं नाव जोडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गुपचूप साखरपुडा आटोपला, आता नुकतंच या कपलने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. ती जोडी म्हणजे ‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा आणि राणा.

Amruta Bane and Shubhankar Ekbote Wedding
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Wedding Anniversary : ऐश्वर्या- अभिषेकने सेलिब्रेट केला लग्नाचा १७ वा वाढदिवस; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समोर आला फॅमिलीचा नवा फोटो

गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. साखरपुडा, व्याही भोजन, मेहंदी, हळद असे सगळे विधी पार पडल्यानंतर आता अमृता बने आणि शुभंकर एकबोटे लग्नबंधनात अडकले आहेत. कपलच्या लग्नातील अनेक फोटोज् सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत. रिल लाईफमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अमृता आणि शुभंकरने रिअल लाईफमध्येही लग्नगाठ बांधली आहे. सन मराठी वरील ‘कन्यादान’ मालिकेमध्ये या दोघांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. मालिकेच्या माध्यमातून दोघांचीही ओळख झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा आणि राणा म्हणजेच अमृता आणि शुभंकरच्या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली आहे. मालिकेमध्ये नवरा-बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी आता रिअल लाईफमध्येही लग्नबंधनात अडकली आहे, यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोघांनीही लग्नामध्ये मराठमोळा साज केलेला पाहायला मिळाला. अमृता बनेने लग्नात गुलाबी नऊवारी साडी नेसली होती. तर शुभंकर एकबोटेने लग्नात कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला होता. शुभंकर मुळचा पुणेरी आहे. त्याच्या हातावर 'मुंबईचा जावई' असं मेहंदीने लिहिलेलं आहे. सध्या शुभंकरच्या ह्या मेहंदीची जोरदार चर्चा होते.

Amruta Bane and Shubhankar Ekbote Wedding
Utkarsh Shinde Post: "कोरस देणारा ते शिंदेशाही ब्रँडचा बादशहा..."; उत्कर्ष शिंदेची वडील आनंद शिंदेंसाठीची खास पोस्ट चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com