Ravi Kishan: भाजप खासदार रवी किशन माझे जैविक वडील; मुंबईच्या तरूणीचा खळबळजनक दावा, डीएनए चाचणीची केली मागणी

Mumbai Girl Claming BJP MP Ravi Kishan: मुंबईतील एका २५ वर्षीय तरुणीने भारतीय जनता पक्षाचे नेते रवी किशन यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. तिने गोरखपूरचे खासदार रवी किशन तिचे जैविक वडील आहेत, असा दावा केला आहे.
Ravi Kishan News
Ravi KishanSaam Tv

मुंबईतील एका २५ वर्षीय तरुणीने शनिवारी न्यायालयात भारतीय जनता पक्षाचे नेते रवी किशन (Ravi Kishan) यांच्या विरोधात दिवाणी खटला दाखल केला आहे. तिने गोरखपूरचे खासदार रवी किशन तिचे जैविक वडील आहेत, असा दावा केला आहे. या तरूणीने डीएनए चाचणीची मागणी केली आहे. शिनोवा नावाच्या तरूणीने तिला अभिनेता-राजकारणी रवी किशन यांची जैविक मुलगी घोषित करण्याची विनंती केली आहे. अपर्णा सोनी आणि भाजप नेत्याच्या नात्यातून तिचा जन्म झाल्याचा दावा तिने केला आहे. (Claming BJP MP Ravi Kishan) रवी किशनने तिला आपली जैविक मुलगी म्हणून स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारे नकार देऊ नये, असा मनाई आदेश जारी करण्याची विनंती या तरूणीने न्यायालयाला केली आहे.

तरूणीने रवी किशनला तिचा जैविक वडील म्हणून जाहीरपणे घोषित केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सोनी आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी (Politics News) मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिकाही दाखल केली आहे. तीन दिवसांपूर्वी किशनची पत्नी प्रीती शुक्ला हिच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे आयपीसी कलम १२०बी (गुन्हेगारी कट), १९५ (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे), ३८६ (खंडणी), ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या शिनोवाच्या रिट याचिकेत लखनऊमध्ये संबंधित कोणतीही घटना घडली नसल्याचं नमूद केलं आहे. तसेच याचिकाकर्ते शुक्ला आणि किशन हे मुंबईचे रहिवासी आहेत, असे असतानाही उत्तर प्रदेशच्या राजधानीत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मालाडच्या (Mumbai Girl Claming Ravi Kishan) दिंडोशी न्यायालयात त्यांच्या दिवाणी दाव्यात म्हटलं आहे की, पत्रकार म्हणून सोनी रवी किशनसह अनेक चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना भेटल्या होत्या.

याचिकेनुसार, सोनी आणि किशन यांनी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, काही वैयक्तिक समस्यांमुळे दोघेही जास्त काळ एकत्र राहू शकले (Mumbai News) नाहीत. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, या तरूणीचा जन्म 19 ऑक्टोबर 1998 रोजी झाला होता. मात्र, तोपर्यंत किशनचे लग्न झाल्याचं उघड झालं होतं.

Ravi Kishan News
Ravi Kishan Commentary: "जिंदगी झंड बा..'' रवी किशनच्या भोजपुरी कॉमेंट्रीचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल - VIDEO

याचिकेत म्हटलंय की, या तथ्यांचा विचार करून किशन आणि सोनी यांनी आपापसात निर्णय घेतला की, त्यांचे मूल अभिनेत्याला काका संबोधतीस. या दोघांनीही गरजेच्या वेळी तिची आवश्यक (BJP MP Ravi Kishan) काळजी घेतल्याचं तरूणीने तिच्या याचिकेत म्हटलं आहे. तथापि, अलीकडेच शिनोवा आणि सोनी भाजप नेत्याला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेले असता त्यांनी गैरवर्तन केलं. त्यांना भेटण्यास नकार दिला, असा याचिकेत आरोप केला आहे.

याचिकेत म्हटलं आहे की, रवी किशनची जैविक मुलगी म्हणून शिनोवाच्या अधिकारांविषयी जनतेला माहिती देण्यासाठी सोनी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत काहीही आक्षेपार्ह बोललं गेलं नाही, तरीही किशनची पत्नी शुक्ला यांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचं शिनोवाने याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणाची दिंडोशी न्यायालयात 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

Ravi Kishan News
Ravi Kishan Filmy Journey: वडिलांना आवडत नव्हता अभिनय, अनेकदा केली मारहणार; रवी किशने सांगितला ‘तो’ किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com