Ravi Kishan Commentary: "जिंदगी झंड बा..'' रवी किशनच्या भोजपुरी कॉमेंट्रीचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल - VIDEO

Ravi Kishan Bhojpuri Commentary: भोजपुरी भाषेत समालोचन करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Ravi Kishan Bhojpuri Commentary Video
Ravi Kishan Bhojpuri Commentary VideoTwitter
Published On

Bhojpuri Commentary In IPL: आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झालं आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आयपीएल स्पर्धेत काही हटके गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

ज्यात इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा समावेश आहे. तर आणखी हटके गोष्ट म्हणजे आयपीएल स्पर्धेचे समालोचन स्थानिक भाषांमध्ये देखील केले जात आहे. दरम्यान भोजपुरी भाषेत समालोचन करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Ravi Kishan Bhojpuri Commentary Video
Cricketers Death: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! IPL स्पर्धा सुरू असतानाच दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास..

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भोजपुरी भाषिकांनी भोजपुरी समालोनाचा मनसोक्त आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन समालोचन करताना दिसून आला होता. त्याच्या समालोचनाचा प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.त्याचे समालोचन सुरु असताना प्रेक्षकांना भोजपुरी भाषेतील शब्द ऐकायला मिळाले, म्हणजे "ए का हो, मुह फोडा का...? तो जिया जवान जिया.. लही गेल-लही गेल" हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भोजपुरी भाषेत समालोचन केल्यानांतर रवी किशनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने भोजपुरी भाषेत समालोचन सुरु केल्यामुळे जिओ सिनेमाचे आभार मानले आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने , "जिंदगी झंड बा, और पहली बार हुए #iplbhojpuri का घमंड बा!!!!' असे लिहिले आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २३ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर चेन्नईने १७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने ५ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com