Cricketers Death: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! IPL स्पर्धा सुरू असतानाच दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास..

Salim Durani Death: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
salim durani
salim durani Saam Tv
Published On

Salim Durani Death News: रविवारी (२ एप्रिल) भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुरानी यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या सलीम दुरानी यांचे गुजरातच्या जामनगरमध्ये निधन झाले आहे.

salim durani
IPL 2023: हेड-टू-हेड आकडेवारी, संभावित प्लेइंग 11 आणि मॅच प्रेडिक्शन, जाणून घ्या SRH VS RR सामन्याविषयी सर्वकाही..

सलीम दुरानी बद्दल बोलायचं झालं तर, ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते ज्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. हा पुरस्कार त्यांना १९६० मध्ये देण्यात आला होता. तसेच त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी भारतीय संघासाठी २९ सामने खेळले ज्यात त्यांनी १२०२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी १ शतक तर ७ अर्धशतके झळकावली होती. (Latest sports updates)

सलीम दुरानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्थानातील काबुल येथे झाला होता. जेव्हा ते केवळ ८ महिन्यांचे होते त्यावेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानमद्ये स्थलांतरित झाले होते. जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाटणी झाली तेव्हा ते भारतात राहायला आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com