IPL 2023: हेड-टू-हेड आकडेवारी, संभावित प्लेइंग 11 आणि मॅच प्रेडिक्शन, जाणून घ्या SRH VS RR सामन्याविषयी सर्वकाही..

SRH VS RR Head To Head Record And Playing 11: चौथा सामना आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
SRH VS RR Head To Head Record
SRH VS RR Head To Head Record Saam TV
Published On

SRH vs RR Live Telecast: आयपीएल 2023 स्पर्धेतील चौथा सामना आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

तर सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा भुवनेश्वर कुमारच्या हाती असणार आहे.

SRH VS RR Head To Head Record
Young Players In IPL: IPL 2023 स्पर्धेत 'हे' 10 युवा खेळाडू घालणार धुमाकूळ ! एक तर ख्रिस गेलला देतोय टक्कर

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. तर सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफचा टप्पा देखील पार करता आला नव्हता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळू शकते.

कोण कोणावर पडणार भारी?

दोन्ही संघ जर पाहिले तर, सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्स संघापेक्षा भक्कम असल्याचे दिसून येते. कारण हैदराबाद संघात आक्रमक फलंदाज आहेत.

हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्करम हा काही दिवसात संघासोबत जोडला जाणार आहे. त्याच्याऐवजी न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स तुफान फटकेबाजी करताना दिसून येऊ शकतो. तर एडन मार्करमच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारला देण्यात आली आहे. (Latest Sports Updates)

SRH VS RR Head To Head Record
Rahmanullah Gurbaz Six: बंदे मे दम है..! IPL च्या दुसऱ्याच चेंडूवर पट्ठ्याने मारला १०१ मीटरचा षटकार - VIDEO

कधी आणि कुठे पाहू शकता हा सामना?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना आज दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तर ३ वाजता नाणेफेक होईल.

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. तसेच जर तुम्हाला हा सामना लाईव्ह पाहायचा असेल तर हॉटस्टार किंवा जियो सिनेमावर पाहू शकता. तसेच तुम्ही लाईव्ह अपडेट्स www.saamtv.com वर देखील मिळवू शकता.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11:

सनरायझर्स हैदराबाद:

मयंक अग्रवाल, एचसी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, टी नटराजन, एजे होसेन, बी कुमार (कर्णधार), उमरान मलिक.

राजस्थान रॉयल्स:

शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, आर पराग, केआर सेन, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एसव्ही सॅमसन (सी), जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com