Young Players In IPL: IPL 2023 स्पर्धेत 'हे' 10 युवा खेळाडू घालणार धुमाकूळ ! एक तर ख्रिस गेलला देतोय टक्कर

Young Players To Watch In IPL 2023: यावर्षी देखील काही युवा खेळाडू पदार्पण करताना दिसून येणार आहेत. कोण आहेत ते खेळाडू, जाणून घ्या.
Young Players In IPL
Young Players In IPLSaam Tv
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. गुजरात विरुद्ध चेन्नईच्या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

अनेक असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आणि त्यानंतर आंतरराष्ट्रिय क्रिकेटमध्ये नाव कमावलं.

यावर्षी देखील काही युवा खेळाडू पदार्पण करताना दिसून येणार आहेत. कोण आहेत ते खेळाडू, जाणून घ्या.

Young Players In IPL
Watch IPL Live Streaming Free: टेन्शन नॉट ! Jio चे सिम नसलं तरी पाहता येणार IPL मॅच, ते कसं ?

१) हॅरी ब्रुक:

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक यंदा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने १३.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने आतापर्यंत टी -२० क्रिकेटमध्ये २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

२) फिन अॅलेन :

न्यूझीलंडचा धाकड सलामीवीर फलंदाज फिन अॅलेन यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत १६० च्या स्ट्राईक रेटने ६१६ धावा केल्या आहेत.

३) कॅमेरन ग्रीन:

आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या कॅमेरन ग्रीनला मुंबई इंडियन्स संघाने १७.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तो पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तो १७३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो. स्ट्राईक रेटच्या बाबतीत हा फलंदाज ख्रिस गेललाही मागे टाकतो. (Latest sports updates)

Young Players In IPL
IPL 2023 Match 1 GT VS CSK: आजपासून रंगणार IPL चा थरार! केव्हा, कधी आणि कुठे रंगणार पहिला सामना? वाचा..

४) नूर अहमद:

अफगाणिस्थान संघातील गोलंदाज नूर अहमद हा आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयाचा गोलंदाज आहे. त्याला गुजरातने ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना ६ सामन्यांमध्ये १० गडी बाद केले होते.

५) विव्रांत शर्मा:

आयपीएल २०२३ स्पर्धेतील लिलावात जम्मू काश्मीरच्या या खेळाडूची मूळ किंमत २० लाख रुपये होती. मात्र फ्रॅंचायजींनी बोली लावायला सुरुवात केली. शेवटी सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६० कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले. त्याने जम्मू काशीर संघासाठी खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये ७८६ धावा खर्च करत १५ गडी बाद केले आहेत.

६) जोशुआ लिटिल:

आयर्लंड संघातील गोलंदाज जोशुआ लिटिल टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेतल्यामुळे चर्चेत आला होता. त्याला गुजरात टायटन्स संघाने ४.४० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याच्या कामगीरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५३ टी -२० सामन्यांमध्ये ६२ गडी बाद केले आहेत.

Young Players In IPL
IPL 2023 Full Schedule: IPL प्रेमींनो तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी? इथे पाहा IPL 2023 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

७)फजल अल फारुकी:

फजल अल फारुकीला हैदराबाद संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. टी -२० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा हा गोलंदाज ७ पेक्षाही कमीच्या सरासरीने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

८)सिकंदर रजा :

झिम्बाब्वे संघातील या धाकड अष्टपैलू खेळाडूला पंजाब संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. त्याने १३२.२२ च्या स्ट्राईक रेटने ३३२० धावा केल्या आहेत.

९) यश ठाकूर:

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवान गोलंदाज यश ठाकूरला लखनऊ सुपर जायंट्स संघाने ४५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले होते. त्यामुळे या गोलंदाजाला संधी मिळाली तर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

१०) फिलिप सॉल्ट:

फिलिप सॉल्ट हा आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. त्याने जगभरातील टी -२० लीग स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com