Ravi Kishan Filmy Journey: वडिलांना आवडत नव्हता अभिनय, अनेकदा केली मारहणार; रवी किशने सांगितला ‘तो’ किस्सा

Happy Birthday Ravi Kishan: अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप भोजपुरी चित्रपटांसोबतच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातूनही एक वेगळीच आपली प्रतिमा तयार केली.
Ravi Kishan Filmy Journey
Ravi Kishan Filmy JourneySaam Tv
Published On

Ravi Kishan Filmy Journey: भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचा आज वाढदिवस. आपल्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याचा जन्म १७ जुलै १९६९ रोजी मुंबईमध्ये झाला. अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप भोजपुरी चित्रपटांसोबतच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातूनही एक वेगळीच आपली प्रतिमा तयार केली. आपल्या अभिनयातून ओळख निर्माण करणाऱ्या रवी किशनकडे एकेकाळी काम नव्हतं. रवी किशन आजही तो दिवस विसरलेला नाही.

Ravi Kishan Filmy Journey
Mahesh Babu Daughter: कौतुकास्पद! महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीनं आपल्या पहिल्या पगारातून ‘अशी’ केली गरजूंची मदत

हातात काम नसलेले दिवस आजही रवीला आठवले तरी, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. रवी किशनचे लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे स्वप्न होते. तो आज एक यशस्वी अभिनेता असला तरी, तो अमिताभ बच्चन यांचा एक मोठा चाहता आहे. बिग बींना आदर्श ठेवून रवीने रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. लहानपणापासून अभिनयात पारंगच असलेल्या रवीच्या वडिलांना त्याने अभिनय केलेला आवडत नव्हतं. अनेकदा वडिलांकडून रवीला मार देखील मिळाला आहे.

एका मुलाखतीत रवी किशन म्हणाला होता की, “ मला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण वडिलांना मी अभिनय केलेला आवडत नव्हता. वडिलांनी मला अनेक वेळा मार देखील दिला आहे. वडिलांना मी अभिनय केलेला पटत नव्हतं म्हणून, मी आईकडून ५०० रुपये घेऊन घर सोडून मुंबईला आलो.” त्याने मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला नेहमीच त्याच्या आईने साथ दिली. रवीने आपले स्वप्न पूर्ण करावे, अशी आईची इच्छा होती.

Ravi Kishan Filmy Journey
Alia Bhatt On Her Motherhood : तू चांगली आई होऊ शकत नाहीस; करिअर आणि घर सांभाळणाऱ्या आलियाला आठवला 'तो' किस्सा

आईकडून आणलेले पैसे कालांतराने संपायला लागले. त्यात काम ही मिळत नव्हतं. आणि पैसे नाही म्हणून पोटाची खळगी कशी भरावी? असा प्रश्न नेहमीच पडायचा. जर काम हातात असेल, तरच तो जेवायचा, नाही तर उपाशी पोटीच झोपायचा. त्यावेळी रवी दहा बाय फूटच्या चाळीतील खोलीत राहत होता. रवी किशन यांनी बी ग्रेड असलेल्या ‘पीतांबर’ या चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावे तसा प्रतिसाद मिळाल नाही. ‘पीतांबर’नंतरही रवीला खूप संघर्ष करावा लागला. त्याने छोट्या छोट्या भूमिका करूनच आपल्या पोटाची खळगी भरली.

Ravi Kishan Filmy Journey
Hemangi Kavi Post: प्रतिक्रिया वाचून शिसारी आली; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर हेमांगी नेटकऱ्यांवर भडकली...

‘तेरे नाम’ मधून रवी किशन यांचे नशीबच पालटले. या चित्रपटात रवी किशनने पंडितची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. परंतू या चित्रपटानंतर अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हतं. दरम्यान अभित्याने भोजपुरी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आजही तो भोजपुरी मनोरंजन विश्वाचा सुपरस्टार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com