Hemangi Kavi Post: प्रतिक्रिया वाचून शिसारी आली; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर हेमांगी नेटकऱ्यांवर भडकली...

Hemangi Kavi News: अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मत व्यक्त केलेय. तसेच आपण कोण झालो आहोत? असा देखील तिने सवाल उपस्थित केला.
Hemangi Kavi Comment On Actor Ravindra Mahajani Death
Hemangi Kavi Comment On Actor Ravindra Mahajani DeathSaam Tv
Published On

Hemangi Kavi Comment On Actor Ravindra Mahajani Death: सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच वयाच्या ७७ वर्षी निधन झालं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडीमधील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्या ८ महिन्यांपासून एकटेच राहत असल्याची माहिती त्यांच्या शेजारच्यांनी दिली. यांच्या निधनानं मराठी चित्रपटात सृष्टीतील अनेक कलाकारांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान आता अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मत व्यक्त केलेय. तसेच आपण कोण झालो आहोत? असा देखील तिने सवाल उपस्थित केला.

Hemangi Kavi Comment On Actor Ravindra Mahajani Death
Pahije Jatiche Trailer: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण सांगणारा ‘पाहिजे जातीचे’ चा ट्रेलर प्रदर्शित...

हेमांगी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक मुद्द्यांवर असो किंवा मनोरंजनसृष्टीतील काही गोष्टींवरही ती अनेकदा भाष्य करते. नुकतेच तिने रविंद्र महाजनी यांच्या निधनावर भाष्य केलंय.

आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून हेमांगी म्हणते, “काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियावरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! Ofcourse बातमी देणाऱ्यांची आता ती स्टाईलच झालीये. बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.”

आपल्या पुढे पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “पण त्या बातमीवर आलेल्या कमेंट्स वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्द्ल, पत्नीबद्दल! असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण! ज्या हिरोला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला!”

Hemangi Kavi Comment On Actor Ravindra Mahajani Death
Aamir Khan Support China: अमिरला भारतात चीनी चित्रपटाचं प्रमोशन करणं पडलं महागात; प्रमोशनल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

फेसबूक पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्री म्हणाली, “ ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते! गश्मीर महाजनी आधीच इतका स्ट्रगल करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry! And Strength to you, boy! Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com