Marathi Serial TRP List : 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला; 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये चुरशीची लढत, जाणून घ्या कोण आहे टॉपवर ?

Marathi Serial: ०६ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यानचं टीआरपी रेटिंग कार्ड जाहीर झालेलं आहे. जाणून घेऊया टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या टॉप १० मालिकांनी बाजी मारली आहे...
TRP Rating Of Marathi Tv Serial 06 April To 12 April
TRP Rating Of Marathi Tv Serial 06 April To 12 AprilSaam Tv

TRP Rating Of Marathi Tv Serial 06 April To 12 April

मराठी चित्रपटांमध्ये जसे निरनिराळे प्रयोग केले जात आहेत तसेच मालिकांमध्येही वेगवेगळे ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्षही मालिकांच्या टीआरपीकडे लागलेलं असतं. मालिकेच्या टीआरपीवर मालिकांचं भविष्य अवलंबून असतं. कमी टीआरपी असणारी मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप १० मालिका कोणत्या आहेत, चला पाहूया.

TRP Rating Of Marathi Tv Serial 06 April To 12 April
Chinmay Mandlekar News : 'इथून पुढे मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही', चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

सध्या अनेक नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याकडून चाहत्यांचे निखळ मनोरंजन होत असून मालिका टीआरपी यादीत अढळ स्थानावर पाहायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टीआरपी यादीत टॉप १ ते टॉप १५ मध्ये स्टार प्रवाहावरील मालिका कायम असून टॉप १६ मध्ये झी मराठीवरील ‘पारू’ मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत.

टीआरपी यादीत अनुक्रमे 'ठरलं तर मग', 'लक्ष्मीच्या पावलांनी', 'प्रेमाची गोष्ट', 'तुझेच मी गीत गात आहे', 'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिका टीआरपीच्या यादीमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. तर झी मराठीवरील 'पारू' ही मालिका १६ व्या क्रमांकावर आहे. नुकतीच ही मालिका रिलीज झालेली आहे. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात रिलीज झालेल्या टीआरपी यादीतील अनेक मालिकांना आपलं स्थान बदलावं लागलं आहे.

पहिल्या क्रमांकावर 'ठरलं तर मग' ही मालिका आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 'लक्ष्मीच्या पावलांनी' तर तिसऱ्या क्रमांकावर 'प्रेमाची गोष्ट' मालिका आहे.

TRP Rating Of Marathi Tv Serial 06 April To 12 April
Shubhankar And Amruta Wedding: ‘कन्यादान’ फेम वृंदा आणि राणाने रिअल लाइफमध्ये बांधली लग्नगाठ; अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न, पाहा Photos

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com