'Project K' gets new official title 'Kalki 2898AD' : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे नवीन नाव रिव्हील झाले आहे. यूएसमध्ये चालू असलेल्या सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) मध्ये मोठ्या धूमधडाक्यात चित्रपटाच्या अधिकृत टायटलची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे अधिकृत नाव 'कल्की 2898 एडी' आहे. टीझर रिलीज करून 'प्रोजेक्ट के' ची बहुप्रतिक्षित झलकही दाखवण्यात आली.
शुक्रवारी सकाळी भारतातही टीझर रिलीज करण्यात आला आहे. प्रभास, कमल हासन आणि दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या उपस्थितीत कॉमिक कॉन येथे चित्रपटाचे टायटल आणि टीझरचे अनावरण करण्यात आले. (Latest Entertainment News)
'कल्की 2898 एडी'चा टीझर रिलीज
चित्रपटाचे टीझर सॅन डिएगो कॉमिक-कॉन येथे 'This is Project K: First Glimpses of India's Mytho-Sci-Fi Epic' या टायटलसह रिलीज करण्यात आले. नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा बहुभाषिक साय-फाय चित्रपट आहे.
टीझरमध्ये असे म्हटले आहे की, 'जेव्हा अंधार जगाला व्यापतो, तेव्हा एक नायक उदयास येतो.' 'कल्की 2898 एडी'च्या टीझरमध्ये भविष्यातील युद्धग्रस्त जग दाखविण्यात आले आहे, जिथे लोक वाईट शक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य करतात आणि अत्याचारी, हिंसक आणि क्रूरपणे वागतात.
टीझर व्हिडिओमध्ये काही ओळीदेखील दिसल्या आहेत, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा अंधार जग व्यापेल, तेव्हा एक शक्ती निर्माण होईल. शेवट आता सुरू होतो.' झलकमध्ये, सैन्यात भरती झालेल्या दीपिकाचे पात्र भावनिक गोंधळात अडकलेले दिसते. तर प्रभासची व्यक्तिरेखा एका शूर योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे जो आपल्या जगाला वाचवण्यासाठी प्रसंगी उठतो.
कल्की 2898 एड रिलीझ तारीख
टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांचा देखील लूक रिव्हील झाला आहे. त्यांचे तोंड पट्टीने बांधलेला आहे तसेच ते एका योद्धाच्या अवतारात दिसत आहेत. तर टीझरमध्ये एका ठिकाणी एक पात्र 'प्रोजेक्ट के म्हणजे काय?'असे विव्हळताना दाखविण्यात आलं आहे. मग त्याचे नाव 'कल्की 2898 AD' असे घोषित केले जाते.
हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी भारतात आणि जगभरात तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होईल. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह अजून वाढला आहे. चाहत्यांसह निर्माते आणि समीक्षकांना 'कल्की 2898 एडी' कडून खूप अपेक्षा आहेत, हा चित्रपट 2024 च्या सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.