
Arjun Rampal 4th Child: अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी गुरुवारी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. अभिनेत्याने त्यांना मुलगा झाला असल्याचे सांगितले आहे. या दोघांना आधी एक मुलगा आहे. त्याचे नाव अरिक असून तो नुकताच चार वर्षांचा झाला आहे. अर्जुनला त्याची पहिली पत्नी मेहर जेसियासोबत दोन मुली आहेत.
अर्जुन रामपाल इंस्टाग्राम पोस्ट
विनी-द-पूहसोबत 'हॅलो वर्ल्ड' छापलेल्या टॉवेलचा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले, "माझ्या कुटुंबाला आणि मला देवाच्या आशीर्वादाने आज एक सुंदर बाळ झाले आहे. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. डॉक्टर आणि नर्स यांच्या अमेझिंग टीमचे आभार. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तुम्ह सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. #helloworld #20.07.2023." (Latest Entertainment News)
अभिनेते राहुल देव यांनी पोस्टवर कमेंट केली आहे , "बाबा आणि आईचे अभिनंदन." बॉबी देओलने लिहिले, "अभिनंदन यार." दिव्या दत्तानेही लिहिले, "हार्दिक अभिनंदन." निर्मात्या प्रज्ञा कपूर यांनी लिहिले, “फायनली!! अभिनंदन, लहान मुंचकिनला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे!, गॅबी आणि मुलांना भरपूर प्रेम!” एमी जॅक्सननेही कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याचे अभिनंदन केले.
मंगळवारी अर्जुनने त्याचा मुलगा अरिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या काही गोंडस फोटो पोस्ट करत लिहिले होते की, "माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुला जे हवं ते मिळे असा आशीर्वाद. डॅडीचे खूप प्रेम . #happybirthdayarik."
अर्जुनची पहिली पत्नी मेहर जेसियासोबत वेगळा झाल्यानंतर अर्जुन आणि मॉडेल गॅब्रिएला अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मेहरपासून त्याला महिका रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत. अर्जुन आणि गॅब्रिएला 2018 मध्ये भेटले आणि काही महिन्यांनंतर डेटिंग करण्यास सुरुवात केली. या जोडप्याने 2019 मध्ये अरिकचे स्वागत केले.
अर्जुन शेवटचा कंगना रनौत सोबत 'धाकड' मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला होता. तो बॉबी देओलसोबत अब्बास मस्तानच्या आगामी पेंटहाउस चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अर्जुन क्रॅक या स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.