Actor Cheated Of 1.5 Crore : अभिनेता विवेक ओबेरॉयची कोट्यावधींची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Vivek Oberoi Files Complaint to Mumbai Police: अभिनेता आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी एप्रिल 2017 मध्ये ऑबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना केली.
Vivek Oberoi On Bollywood
Vivek Oberoi On Bollywood Saam Tv
Published On

Vivek Oberoi Duped Of ₹1.55 cr by Business Partners : अभिनेता विवेक ओबेरॉयने व्यावसायिक पार्टनर्सविरुद्ध 1.55 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विवेक ओबेरॉयने आरोप केला आहे की, आरोपींनी त्याला एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला सांगितले आणि भरपूर प्रॉफिट मिळेल असे आश्वासन दिले. मात्र, नंतर आरोपींनी या पैशांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला. मुंबईतील एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अभिनेत्याच्या फर्म, ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट एलएलपीने चार्टर्ड अकाउंटंट देवेन बाफना यांना त्यांच्या वतीने आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीचे आरोपी पार्टनर्स संजय शाह, नंदिता शाह, राधिका नंदा आणि इतरांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृतपणे सांगितले आहे.

अभिनेता आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी एप्रिल 2017 मध्ये ऑबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना केली. हे कंपनी सेंद्रिय उत्पादनांचे उत्पादन, खरेदी आणि विक्री करते. परंतु तीन वर्षांनंतर, बाजारात सेंद्रिय उत्पादनांना मागणी कमी असल्याने ते कंपनी बंद करण्याचा विचार करत होते. (Latest Entertainment News)

Vivek Oberoi On Bollywood
Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’ फेम ‘मधुराणी’च्या घटस्फोटाच्या वृत्ताचे पतीकडून खंडन

यादरम्यान, अभिनेता संजयच्या संपर्कात आला, जो एक कार्यक्रम आयोजित करत होता आणि चित्रपटांची निर्मिती करत होता. इव्हेंट आणि चित्रपट उद्योगातील त्यांचा अनुभव पाहून विवेक ओबेरॉयने त्यांच्यासोबत चित्रपट उद्योगातील कार्यक्रम आयोजित करण्याच्या व्यवसायासाठी भागीदारी केली.

फेब्रुवारी 2020 मध्ये, ओबेरॉय आणि संजय अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवसाय करारावर चर्चा करण्यासाठी भेटले आणि अटींवर परस्पर सहमत झाले.

पोलिस तक्रारीनुसार, त्यांच्या परस्पर सामंजस्यानुसार आणि करारानुसार, जुलै आणि सप्टेंबर 2020 दरम्यान, विवेक ओबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीचा व्यवसाय उद्देश आणि त्याचे नाव बदलून आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये रूपांतरित केले गेले, जे चित्रपट उद्योगात इव्हेंट आयोजित करेल आणि चित्रपटांची निर्मिती करेल.

संजय आणि त्याच्या आईचे नाव आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये पार्टनर्स म्हणून समाविष्ट करण्यात आले. संजयच्या ओळखीच्या राधिकाचे नाव देखील फर्ममध्ये पार्टनर म्हणून जोडले गेले आणि अभिनेत्याची पत्नी प्रियंका हिला राजीनामा द्यायला लावले.

Vivek Oberoi On Bollywood
Yashwant Natya Mandir News: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज, १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी होणार खुले

सहा महिन्यांनंतर, अभिनेता आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीच्या पार्टनशीपमधून बाहेर पडला आणि त्याने त्याचा हिस्सा (33.33%) त्याच्या फर्म ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये कॉन्व्हर्ट केला, असे पोलिसांनी सांगितले.

नोव्हेंबर २०२१ पर्यंत, अभिनेत्याने आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये ९५.७२ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

फेब्रुवारी 2021 मध्ये, शाह आणि ओबेरॉय यांनी 'गणशे' चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला त्यासाठी साइन केले गेले आणि ओबेरॉयने त्यासाठी 51 लाख रुपये दिले. दिग्दर्शक आणि लेखक यांनाही मोबदला दिला गेला. ओबेरॉय आणि संजय चित्रपटाच्या प्रसारणासाठी Zee5 च्या OTT प्लॅटफॉर्मशी चर्चा करत होते, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

2022 च्या सुरुवातीस, त्याच्या गुंतवणुकीचे तपशील पाहताना, विवेक ओबेरॉयच्या लक्षात आले की संजयने पैशांचा गैरवापर केला. जेव्हा विवेक फर्मच्या व्यवस्थापकाशी बोलले तेव्हा तिने देखील त्यास दुजोरा दिला.

Vivek Oberoi On Bollywood
Arjun Rampal Welcome Baby Boy : ५० वर्षीय अर्जुन रामपाल झाला चौथ्यांदा बाबा ; पोस्ट करत दिली गोड बातमी

अभिनेत्याने त्याच्या सीएला कामाला लावले. तेव्हा कळले की संजय, नंदिता आणि राधिका यांनी कंपनीच्या 58.56 लाख रुपयांच्या निधीचा कथितपणे विमा भरणे, दागिने खरेदी करणे, पगार काढणे इत्यादी वैयक्तिक खर्चासाठी वापरला आहे, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

नंतर विवेकला कळले की संजयने आनंदिता स्टुडिओ प्रा.लि. ही आणखी एक फर्म स्थापन केली आहे. त्यांची फर्म, आनंदिता स्टुडिओज प्रा. लि., 'गणशे' चित्रपटाची निर्मिती करत होती. यानंतर अभिनेत्याने नवाजुद्दीन सिद्दीकीला या फसवणुकीबद्दल सांगितले, त्यानंतर सिद्दीकीने ओबेरॉयला 51 लाख रुपये परत केले.

ओबेरॉयच्या प्रतिनिधीने केलेल्या तक्रारीवरून, एमआयडीसी पोलिसांनी संजय, त्याची आई नंदिता आणि राधिका यांच्यावर कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४०९ (लोकसेवक, बँकर, व्यापारी किंवा एजंट यांच्याकडून विश्वासघाताचा फौजदारी), ४२० (फसवणूक) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com