Yashwant Natya Mandir News: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज, १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी होणार खुले

Yashwant Natya Mandir Opening News: यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज, १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी होणार खुले
Yashwant Natya Mandir Opening News
Yashwant Natya Mandir Opening NewsSaam Tv
Published On

Yashwant Natya Mandir Opening News: ‘यशवंतराव नाट्य संकुल’ या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेले काही दिवस नूतनीकरण सुरु असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे.

बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे. सदर संस्थांनी प्रयोग करण्यासाठी नाट्य संकुल व्यवस्थापकांकडे रीतसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले ह्यांनी केले आहे.

Yashwant Natya Mandir Opening News
Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’ फेम ‘मधुराणी’च्या घटस्फोटाच्या वृत्ताचे पतीकडून खंडन

आधुनिक, अद्ययावत अशा या नाट्य संकुलात सुरेख अंतर्गत सजावट, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वछतागृह आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरु झाले होते. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर श्री. प्रशांत दामले, नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले. याच प्रयत्नांमुळे येत्या १ ऑगस्ट पासून हे नाट्य संकुल सज्ज होत आहे. (Latest Marathi News)

Yashwant Natya Mandir Opening News
Sonu Sood Launches Free LAW Coaching Program: सोनू सूदच्या माध्यमातुन वकिली शिका अन् तेही मोफत, पहा काय आहे प्रकरण

नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com