Sonu Sood Launches Free LAW Coaching Program: सोनू सूदच्या माध्यमातुन वकिली शिका अन् तेही मोफत, पहा काय आहे प्रकरण

Sonu Sood News: सोनूने कायद्याचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा पुढाकार घेतला आहे.
Sonu Sood Launches Free LAW Coaching Program
Sonu Sood Launches Free LAW Coaching ProgramSaam Tv
Published On

Sonu Sood Launches Free Law Entrance Coaching Program: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमीच कोणत्या ना कारणासाठी तो चर्चेत असतो. अभिनेता अनेकदा अभिनयामुळे नाही तर तो नेहमीच करत असलेल्या समाजकार्यासाठी तो ओळखला जातो. अभिनेत्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे.

अभिनेत्याने कोविड काळात अनेक गरजुंना मदत केली होती. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे जितके कौतुक झाले तितकेच किंवा त्याही पेक्षा जास्त कौतुक हे त्याच्या या समाजकार्याचे झाले. यावेळी देखील अभिनेता असंच काही एका कारणामुळे चर्चेत आला. सोनूने कायद्याचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा पुढाकार घेतला आहे.

Sonu Sood Launches Free LAW Coaching Program
Khalapur Irshalwadi Landslide: ‘माझ्या खूप जवळचा विषय...’ इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट

आतापर्यंत अभिनेत्याने अभिनयात आणि समाजकार्यातून आपली ओळख प्रस्थापित केली होती. आता सोनूने शैक्षणिक कार्यात देखील पुढाकार घेतला होता. सोनू सूदच्या माध्यमातून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे.

सोनू सूदने ‘संकल्प’च्या माध्यमातून वकिला पेशाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना मोफत शिक्षण घेता येणार आहे. ‘संकल्प’हा एक मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा अभ्यासक्रम अनेक विद्यार्थांना व्यावसायिक कायदेशीर शिक्षण घेण्यासाठी आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये (NLUs) एक स्वत:चे स्थान निश्चित करण्यासाठी मदत करेल.

‘संकल्प’ या कार्यक्रमाबद्दल सोनू सूद म्हणाला, “ज्या विद्यार्थ्यांना आपले करियर वकिली पेशात करायचे आहे, त्यांना गाईड करण्यासाठी माझी देवाने निवड केली आहे. देवाने माझी निवड केल्याबद्दल मी खूपच आनंदित आहे. मला विश्वास आहे की, आपला भारत देश नक्कीच सुरक्षित आणि सक्षम हातात असेल.”

Sonu Sood Launches Free LAW Coaching Program
Swanandi Tikekar Boyfriend: प्रेम म्हणजे प्रेम असतं! स्वानंदी टीकेकरने सोशल मीडियावर सांगितली मनातली गोष्ट
Sonu Sood Launches Free Law Entrance Coaching Program
Sonu Sood Launches Free Law Entrance Coaching ProgramInstagram

ज्या विद्यार्थांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक फटका बसला किंवा जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतील, असेच विद्यार्थी ‘संकल्प’ या संस्थेत वकीली पेशाचं शिक्षण घेऊ शकतील. या संधीचा फायदा ११वी, १२ वीतील विद्यार्थी, अलीकडेच पदवीचे शिक्षण पुर्ण झालेय, अशा विद्यार्थांनाच या संधीचा फायदा घेता येणार आहे. यावेळी सोनू चाहत्यांचं शैक्षणिक कार्यातून मन जिंकत आहे. आता सोनू सूदने हा अनोखा संकल्प केल्याने गरजु विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

Sonu Sood Launches Free LAW Coaching Program
Bollywood on Manipur Violence : मणिपूर घटनेवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला रोष, अत्याचाराचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटी म्हणाले...

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता शेवटचा चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘सम्राट पृथ्वीराज’ मध्ये अक्षय कुमार, संजय दत्त आणि मानुषी छिल्लर सोबत दिसला होता. अभिनेत्याने चांद बरदाईची भूमिका साकारली होती. सोबतच, सोनू सध्या रोडीजचा नवीन सीझन होस्ट करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com