Amitabh Bachchan Health Update: बिग बी ठणठणीत, रुग्णालयात दाखल झाल्याच्या चर्चांवर अमिताभ बच्चन यांनी केले भाष्य

Amitabh Bachchan News: बिग बींनी स्वत: आपल्या हेल्थबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी आपल्यावर शस्त्रक्रिया झाली नाही आणि मला रूग्णालयामध्ये दाखल केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
Amitabh Bachchan Hospitalization Rumor
Amitabh Bachchan Hospitalization RumorSaam Tv

Amitabh Bachchan Hospitalization Rumor

बॉलिवूडचे महानायक आणि शहेनशाह अमिताभ बच्चन कायमच इंटरनेटवर चर्चेत असतात. काल दुपारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रूग्णालयामध्ये अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीबद्दल चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना करण्यात येत होती. (Bollywood)

अशातच बिग बींनी स्वत: आपल्या हेल्थबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी आपल्यावर शस्त्रक्रिया झाली नाही आणि मला रूग्णालयामध्ये दाखल केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर बिग बी मुलगा अभिषेकसोबत 'ISPL T10' चा क्रिकेट सामना पाहतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. (Bollywood News)

Amitabh Bachchan Hospitalization Rumor
Yodha Day 1 Collection: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ला संमिश्र प्रतिसाद, तर अदा शर्माच्या ‘बस्तर’ची कमाई निराशाजनक

त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रूग्णालयामध्ये अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिले होते. नुकतंच बिग बी मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत ठाण्याच्या दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये 'ISPL T10' चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. सामना पाहिल्यानंतर त्यांनी मीडियासोबत संवाद साधला होता. त्यावेळी गर्दीतून बाहेर पडत असताना, बिग बींकडे एका व्यक्तीने त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी चाहत्याला हाताने इशारा करत सर्व ठिक असल्याचं सांगितलं. त्यानंतर बिग बी स्वत: ही Fake News असल्याचे सांगितले. (Social Media)

बिग बींनी एक्सवर एक फोटोशेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बसलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बिग बींनी कॅप्शन दिले की, " 'ISPL T10'च्या फायनलमध्ये मला आज खूप चांगला अनुभव आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत क्वालिटी वेळ घालवता आला. त्यांच्याकडून क्रिकेटबद्दल खूप गोष्टी शिकता आल्या." त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून बीग बींच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. त्यासोबतच लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा, असे त्यांना सांगण्यात येत आहे. (Viral Video)

Amitabh Bachchan Hospitalization Rumor
Rajpal Yadav Birthday: दोन लग्न, तुरुंगवास अन्...; कॉमेडी किंग राजपाल यादवच्या लाईफमधील माहित नसलेले किस्से

बिग बींच्या एका जवळच्या सूत्राने ‘झूम’ला दिलेल्या माहितीनुसार, "बिग बी यांची तब्येत व्यवस्थित आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त खोटं आहे. अमिताभजी त्यांच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. आता अवघ्या काही तासांच्या असलेल्या टेस्ट करून अमिताभ बच्चन अगदी ठणठणीत घरी परतले."

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. ८१ व्या वर्षी देखील ते काम करत आहेत. अजूनही बिग बी वेगवेगळ्या कलाकृतींतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अमिताभ बच्चन यांचा फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये चाहतावर्ग आहे.

त्यांच्या नवनवीन चित्रपटांसाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ते नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करतात. (Entertainment News)

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत ३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 'थलाइवर १७०' नावाच्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत स्क्रीन शेअर करणार आहेत. १९९१ मध्ये दोघांनी मुकल. एस आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या 'हम' चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर आता दोघेही लवकरच 'थलाइवर १७०' मध्ये एकत्र दिसणार आहे. या चित्रपटासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत.

Amitabh Bachchan Hospitalization Rumor
Priyanka Chopra: प्रियंका चोप्राचा थाटच वेगळा, मायदेशी परताच 'देसी गर्ल'ने दाखवला जलवा; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com