Rajpal Yadav Birthday: दोन लग्न, तुरुंगवास अन्...; कॉमेडी किंग राजपाल यादवच्या लाईफमधील माहित नसलेले किस्से

Rajpal Yadav Life Story: १६ मार्च १९७१ रोजी राजपाल यादवचा जन्म झाला आहे. आज राजपाल आपला ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
Rajpal Yadav Birthday
Rajpal Yadav BirthdaySaam Tv
Published On

Rajpal Yadav Birthday

रूपेरी पडद्यावरील प्रमुख अभिनेता होणे काही सोपे नाही. अभिनय आणि कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण करणे फार महत्वाची गोष्ट आहे. कॉमेडी करणे प्रत्येक अभिनेत्यालाच जमते, असे नाही. असे क्वचितच काही कलाकार आहेत, ज्यांनी कॉमेडीचे अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे राजपाल यादव. राजपाल यादवने आपल्या अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आज राजपाल यादवचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल. (Bollywood)

Rajpal Yadav Birthday
Priyanka Chopra: प्रियंका चोप्राचा थाटच वेगळा, मायदेशी परताच 'देसी गर्ल'ने दाखवला जलवा; VIDEO व्हायरल

१६ मार्च १९७१ रोजी राजपाल यादवचा जन्म झाला आहे. आज राजपाल आपला ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. राजपालचा जन्म उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कुलरा शहरात झाला आहे. राजपालचे असे अनेक पात्र आहेत, जे आजही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. ‘भुल भुलैय्या’ मधील त्याच्या ‘छोटा पंडित’ या पात्राने त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. राजपालने आपले बालपण गरिबीत घालवले. टेलरिंगचे काम करून त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. (Bollywood Actor)

राजपाल यादवला आर्मीमध्ये भरती होण्याची खूप आवड होती. पण उंची नसल्यामुळे त्याची काही निवड झाली नाही. त्यानंतर राजपाल यादवने ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याची त्या कंपनीमध्ये टेलर म्हणून निवड झाली. त्या कंपनीमध्ये नोकरी लागल्यानंतर कुटुंबीयांनी लहान वयातच त्याचे लग्न लावून दिले होते. पण त्याच्या पत्नीचे नवजात बालकांना जन्म देताना तिचे निधन झाले. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. पण, त्याच्या पत्नीचे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच निधन झाले होते. तर, राजपालने २००३ मध्ये राधासोबत दुसरे लग्न केले असून त्यांना एक मुलगीही आहे. (Bollywood Film)

Rajpal Yadav Birthday
Orry Income Source: बाबो! एका लग्नाला जायला ओरी किती पैसे घेतो माहितीये का? आकडा बघून डोळे गरागरा फिरतील

राजपालने ५ कोटींचे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडणे त्याला जमले नाही. अभिनेत्याने दिल्ली उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. याबद्दल अभिनेत्याला तिहार जेलमध्ये काही दिवसांची शिक्षा सुनावण्यात आलेली. ज्यावेळी तो तुरूंगातून बाहेर आला त्यावेळी त्याला तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला एक ऐवजी दोन प्रमाणपत्रे दिली. त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे कौतुक केले होते. (Bollywood News)

'हंगामा', 'अपना सपना मनी मनी', 'चुप चुप के', 'भूल भुलैया', 'गरम मसाला', 'फिर हेरा फेरी', 'ढोल', 'मैं, मेरी पत्नी और वो', 'मुझसे शादी करोगे', 'भूतनाथ'सह अनेक मोठ्या चित्रपटात राजपाल यादवने काम केले आहे. राजपाल यादव एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम विनोदी कलाकारही आहे. (Entertainment News)

Rajpal Yadav Birthday
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन कोकिलाबेन रुग्णालयात, सकाळी झाली अँजिओप्लास्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com