प्रेग्नेंट Deepika Padukone ला गर्दीपासून वाचवण्यासाठी सुपरहिरो बनला Ranveer Singh, ट्रोलर्सने देखील केलं कौतुक

Ranveer Singh And Deepika Padukone Video: दीपिका आई होणार असून लवकरच या कपलच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे. सध्या या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Ranveer Singh And Deepika Padukone Video
Ranveer Singh And Deepika Padukone VideoSaam Tv

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding:

बॉलिवूडचे (Bollywood) स्टार कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. एकमेकांप्रती असलेले प्रेम, चित्रपट असो वा त्यांचा प्रोजेक्ट यामुळे दीपिका आणि रणवीर चर्चेत असतात. अशामध्ये नुकताच या स्टार कपलने गुड न्यूज शेअर केली. दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आई होणार असून लवकरच या कपलच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे. सध्या या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आई-बाबा होणार असल्याची घोषणा केल्यानंतर हे कपल मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी दोघेही डॅशिंग लूकमध्ये एकत्र दिसले. आता या सगळ्यानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सिरेमनीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणला देखील यासाठी आमंत्रित करण्यात आले असून गुरुवारी रात्री हे कपल जामनगरला पोहचले. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी रणवीर सिंग प्रग्नेंट दीपिका पदुकोणला गर्दीपासून वाचवताना दिसला. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे कपल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. गुडन्यूज शेअर केल्यापासून एकापाठोपाठ एक या कपलचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. नुकताच हे कपल मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचले. हे कपल जामनगरला पोहचताच पापाराझींनी त्यांना स्पॉट केले. यावेळी रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणला गर्दीपासून वाचवताना दिसला. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranveer Singh And Deepika Padukone Video
Rajinikanth Viral Video: रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

रणवीर सिंगचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. यासोबतच ट्रोलर्स देखील रणवीर सिंगचे कौतुक करताना दिसत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा हा व्हिडिओ चाहते प्रचंड शेअर करत आहेत. यासोबतच यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करताना दिसले. कमेंट करताना एका यूजरने रणवीर सिंगला 'बेस्ट पती' म्हणून टॅग केले. यावेळी ट्रोलर्स देखील रणवीर सिंगचे कौतुक करत आहेत.

Ranveer Singh And Deepika Padukone Video
Anant-Radhika Pre-Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनची थीम काय?, नीता अंबानीने केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com