Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान गोळीबारात नव-नवीन खुलासे होत आहेत. आज सकाळी मुंबई गुन्हे शाखेने पाचव्या आरोपीला अटक केलीय आता याच प्रकरणात आणखी एका गँगस्टरची एन्ट्री झालीय.
Salman Khan House Firing Case
Salman Khan House Firing Case

सचिन गाड

मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर आलीय. या गोळीबार प्रकरणामध्ये गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री झालीय. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी हा गँगस्टर रोहित गोदाराच्या सतत संपर्कात होता. हे दोघेही एका ॲपद्वारे संपर्कात होते.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गोळीबारात नव-नवीन खुलासे होत आहेत. आज सकाळी मुंबई गुन्हे शाखेने पाचव्या आरोपीला अटक केलीय आता याच प्रकरणात आणखी एका गँगस्टरची एन्ट्री झालीय. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याआधी विक्की चौधरी, सागर पाल, सोनू चंदर आणि अनुज थापन यांना पोलिसांनी अटक केली होती. आता राजस्थानमधून मोहम्मद चौधरीला अटक केली. चौधरीने गोळीबार करणाऱ्यांना मदत पुरवली होती.

आता प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री झालीय. रोहित गोदाराने अनमोल बिश्नोईशी कॉन्फरन्स कॉलवर करुन या गोळीबाराची चर्चा केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आलीय. रोहित गोदाराच्या सांगण्यावरुन त्याने शूटर विक्की गुप्ता आणि सागर पालची मुंबईत आल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर दोन दिवसात गुन्हे शाखेने पहिली अटक करताच अटकेच्या भीतीने मोहम्मद चौधरी राजस्थानला पळाल्याचं गुन्हे शाखेकडून सांगण्यात येत आहे. मोहम्मद रफिक चौधरीवर शूटरना आर्थिक सहाय्य करणे तसेच रेकी करणे आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती गु्न्हे शाखेने दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com