Meta Gala 2024 : १६३ कारागीर, १९६५ तास...; मेट गालामध्ये आलिया भट्टची रॉयल एन्ट्री, हटके साडीची जगभर चर्चा

Met Gala 2024 Alia Bhatt Look : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'मेट गाला २०२४'मध्ये उपस्थिती लावत चाहत्यांमध्ये सौंदर्याची छाप पाडली आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
Met Gala 2024 Alia Bhatt Look
Met Gala 2024 Alia Bhatt LookInstagram

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Aalia Bhatt) आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयासह सौंदर्याची छाप पाडली आहे. आलियाच्या फॅशन सेन्सची कायमच सोशल मीडियावर तुफान चर्चा होते. अशातच नुकतंच आलियाने 'मेट गाला २०२४'मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. मेट गालामधल्या आलियाच्या लूकची आणि तिने नेसलेल्या साडीची जोरदार चर्चा होत आहे.

Met Gala 2024 Alia Bhatt Look
Kushal Badrike : “सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो...”; कुशल बद्रिके आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेला, पोस्ट चर्चेत

या फॅशन विकमध्ये, अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजातील साडी नेसली होती. ही स्टायलिश साडी नेसून आलियाने मेट गालाच्या रेड कार्पेटवर वॉक केला होता. अभिनेत्रीला साडीत पाहून चाहते लूकचे कौतुक करीत आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. आलियाच्या या सौंदर्यासमोर अप्सरा आणि मस्तानी फेल आहेत, अशी कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये आलियाने सांगितलं की, एकूण १६३ लोकांनी ही साडी बनवली आहे. साडी तयार करण्यासाठी जवळपास १९६५ तास लागले आहेत. साडीवरील डिझाईन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटसाठी आलियाने सब्यसाचीने डिझाईन केलेली पेस्टल कलरची साडी नेसली आहे. आलियाने आपल्या लूकवर स्मोकी मेकअप करून आणि स्टायलिश दागिने कॅरी करत पूर्ण केलेला आहे.

Met Gala 2024 Alia Bhatt Look
प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

साडीसोबत तिने कॅरी केलेला डीपनेक ब्लाऊज सुंदर दिसत असून शॉर्ट स्लीव्ह्ज आहेत. अभिनेत्रीच्या ह्या लूकचे चाहते कौतुक करीत आहेत. आलियाच्या ह्या लूकचे आई सोनी राजदन आणि सासू नीतू कपूर दोघींनीही कौतुक केले आहे. आलियाच्या ह्या लूकवर २६ लाख इतके लाईक्स मिळाले असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

Met Gala 2024 Alia Bhatt Look
Heeramandi Mistakes : संजय भन्साली यांच्या ‘हीरामंडी’मध्ये सीन्स चुकले; पेपरमध्ये दिसल्या कोरोनाच्या बातम्या तर लायब्ररीमध्ये दिसलं २००४ मधलं पुस्तक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com