अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. उत्तम अभिनय आणि दमदार विनोदीशैलीमुळे कुशल बद्रिकेचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कुशलने स्ट्रगलच्या दिवसांवर भाष्य केले आहे. रेल्वेचा आशय घेत अभिनेत्याने थोडक्यात काही शब्दात त्याने आपलं स्ट्रगल लिहिलेलं आहे.
अवघ्या काही तासांपूर्वीच कुशलने ब्लॅक कोट, शर्ट आणि पँट वेअर करत एक नवीन फोटोशूट त्याने केलेले आहे. फोटो पोस्ट करताना अभिनेत्याने कॅप्शन दिलंय की, “सुरवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला, तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे गर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली. काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली.”
पोस्टच्या शेवटच्या भागात तो म्हणतो, “ “बकासुरा सारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला; ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत रहायचं. आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्या सारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात, सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो !! :- सुकून.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.