बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा 'UT 69' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेनंतर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात दोन महिने घालवलेल्या राज कुंद्राची कहाणी आपल्याला या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राज कुंद्राने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, 'जेलमध्ये असताना आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला होता. पण शिल्पाने मला खूपच सपोर्ट केला. तिने फोन करून सांगितलं की मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मी माझा निर्णय बदलला.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राज कुंद्राने तुरूंगातील वेदनादायक काळ आठवत सांगितले की, 'आम्हाला आठवड्यातून फक्त एक कॉल करण्याची परवानगी होती आणि तीही काही मिनिटांसाठीच. मग मी आणि शिल्पा एकमेकांना पत्र लिहायचो. जेलमध्ये असताना मला खूप रडायला यायचे. पण जेलच्या आतमध्ये जर एखादा पुरुष रडायला लागला तर त्याला सर्वजण कुमकुवत समजायला लागतात आणि मारहाण करतात. तुम्हाला तिकडे स्ट्राँग असल्याची अॅक्टिंग करावी लागते.'
'अनेकदा मी तोंडावर चादर घेऊन रडायचो. बऱ्याचदा आत्महत्या करावी असा विचार माझ्या मनात आला. खरं तर शिल्पासोबत आठवडा किंवा दहा दिवस माझं बोलणं व्हायचं नाही. मी शिल्पासोबत फोनवर बोलणं करून द्यावे यासाठी खूप भीक मागितली. शेवटी शिल्पाचा कॉल आला आणि ती म्हणाली राज मी तुझ्यासोबत आहे. लवकरच आपण यातून बाहेर असू श्रद्धा आणि सबुरी ठेव. त्यानंतर मला थोडी हिंमत मिळाली. शिल्पाने मला सांगितले की, तुझे कुटुंब बाहेर तुझी वाट पाहत आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी एकदा विचार कर.'
राज कुंद्राने जेलमधील त्या कठीण काळाबद्दल सांगितले की, 'प्रत्येक आठवड्याला मला वाटायचे आज आवाज येईल की राज तुझा जामीन झालाय. पण तसे व्हायचे नाही. त्यामुळे मी आतून तुटत होतो. जेलमधील लोकांना विश्वास नव्हता बसत की मी शिल्पा शेट्टीचा नवरा आहे. ज्या दिवशी मला जामीन मिळाला तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता.'
राजने पुढे सांगितले की, 'जेलमधील काही लोकांशी माझी ओळख झाली होती. तिथे काही लोकं अशी आहेत जी सिस्टममुळे अडकले आहेत. काही लोकांची बेल ऑर्डर आली आहे पण त्यांना माहिती नव्हते की ५०० रुपये भरून ते बाहेर येऊ शकतात. मी बाहेर आल्यानंतर आपल्या लीगल टीमसोबत चर्चा करून अशा अनेक लोकांना मदत केली. जेलमध्ये माझी सुशील नावाच्या एका स्कूल टीचरसोबत ओळख झाली होती. आम्ही इंग्रजीमध्ये बोलायचो. मी आजही त्याच्या संपर्कात आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.