अमेरिकेतील फिल्म कॉरिडॉरमधून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘ब्लॅक ॲक्शन हिरो’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते रिचर्ड राऊंडट्री यांचे निधन झाले आहे. रिचर्ड यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली असून पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे (Pancreatic Cancer) त्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हॉलिवूड पब्लिकेशन डेडलाईनने दिलेल्या माहितीनुसार, १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाफ्ट’ चित्रपटामुळे त्यांना ओळखले जाते. या चित्रपटामुळे रिचर्ड राऊंडट्री यांना फार लहान वयातच प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट अमेरिकेच्या इतिहासातला पहिला ‘ब्लाक्सप्लॉयटेशन’ चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये रिचर्ड यांनी एका खासगी गुप्तहेराचे पात्र साकारले होते. रिचर्ड यांच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने चाहत्यांचे मने जिंकले. (Actor)
चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर सिक्वेल आणि टेलिव्हिजन स्पिनऑफ बनले होते. रिचर्डचे मॅनेजर पॅट्रिक मॅकमिननने अभिनेत्याच्या निधनाबद्दल सांगितले की, रिचर्ड यांचे काम आणि त्यांची सिनेकारकिर्द आफ्रिकन आणि अमेरिकन चित्रपट उद्योगविश्वासाठी एक विशेष योगदान आहे. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी दिलेले योगदान विसरण्यासारखे नाही. (Hollywood Movies)
रिचर्ड राऊंडट्री यांनी ‘शाफ्ट’नंतर ‘शाफ्ट इन आफ्रिका’, ‘स्टील’, ‘मुव्हिंग ऑन’, ‘मॅन फ्रायडे’ यांसारख्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रिचर्ड यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी दोन लग्न केले होते. त्यांचे पहिले लग्न मेरी जेनसोबत झाले होते. १९६३ ते १९७३ पर्यंत त्यांचे पहिले लग्न टिकले. तर दुसरे लग्न करिन सोरेनसोबत केले. करिन आणि रिचर्ड यांना चार मुली आहेत. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.