प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Plea Against Jolly LLB 3 Movie: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होताच अजमेर न्यायालयात चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Plea in Court Against Jolly LLB 3 Movie
Plea in Court Against Jolly LLB 3 MovieInstagram

अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या मोस्ट अवेटेड ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या शूटिंगला गेल्या आठवड्यापासून सुरूवात झाली होती. पण चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाविरोधात अजमेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड यांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. हा चित्रपट न्यायालयीन प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

Plea in Court Against Jolly LLB 3 Movie
Met Gala 2023: जीव अडकला मोत्यात... १ लाख मोत्यांचा ड्रेस असतो तरी कसा? Alia Bhatt ला बघाच!

NBT च्या रिपोर्टनुसार, आजच या खटल्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या शूटिंगवर बंदी घालावी, अशी मागणी चंद्रभान सिंह यांनी आपल्या याचिकेत केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने न्यायालयीन प्रक्रियेची खिल्ली उडवली होती. या फ्रँचायझीच्या पहिल्या दोन्ही चित्रपटांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड आपल्या याचिकेमध्ये म्हणाले आहेत.

अजमेर आणि आजूबाजूच्या गावातील डीआरएम कार्यालयात (Division Raillway Management Office) चित्रपटाची शूटिंग पुढचे काही दिवस सुरू राहणार आहे. शूटिंगच्या वेळीही चित्रपटातील कलाकार न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींच्या प्रतिष्ठेबाबत गंभीर दिसत नव्हते.

‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’च्या घवघवीत यशानंतर आता निर्माते ‘जॉली एलएलबी ३’ प्रेक्षकांच्या समोर आणणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटात हुमा कुरेशी देखील दिसणार असून, ती शूटिंगसाठी अजमेरला पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com