Ajmer 92 Trailer : अजमेरमध्ये २५० मुलींसोबत घडलं होतं घृणास्पद कृत्य? हृदय पिळवटून टाकणारा 'अजमेर 92'चा ट्रेलर प्रदर्शित

Ajmer 92 Trailer Out : क्राइम-ड्रामा चित्रपट 'अजमेर 92' चा हृदय पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Ajmer 92 Trailer Released
Ajmer 92 Trailer Released Instagram ajmer92movie
Published On

Ajmer 92 Trailer Released : क्राइम-ड्रामा चित्रपट 'अजमेर 92' चा हृदय पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कथा अजमेरमधील बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. शहरात अडीचशेहून अधिक मुलींवर धाक दाखवून बलात्कार केल्याचा दावा केला जात आहे.

अजमेरमधील मुलींची अवस्था भयावह झाली होती. हे भयंकर षडयंत्र एका पत्रकाराने उघडकीस आणले. त्या पत्रकासाठी हे सर्व उघड करणे सोपे नव्हते.

'अजमेर 92' चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंग यांनी केले आहे. सूरज पाल राजक, ज्ञानेंद्र प्रताप सिंग आणि पुष्पेंद्र सिंग यांनी ही कथा लिहिली आहे. हा चित्रपट 21 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

Ajmer 92 Trailer Released
Jawan Music Director : जवानच्या संगीत दिग्दर्शकाने घेतलं ऑस्कर विजेते ए आर रेहमानपेक्षा भरभक्कम मानधन

या चित्रपटात राजस्थानमधील अजमेर येथे घडलेल्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. फारुक आणि नफीस चिश्ती हे प्रमुख खादिम कुटुंबातील सदस्य आहेत. अजमेर शरीफ दर्ग्याच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर होती.

250 हून अधिक हिंदू मुलींवर अनेक वर्षांच्या कालावधीत त्याच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या गटाने वारंवार सामूहिक बलात्कार केला आणि त्यांना ब्लॅकमेल केले, हे सर्व 1992 मध्ये संपले. यातील अनेक मुली या अल्पवयीनही होत्या.

या चित्रपटात करण वर्माने माधव वर्मा यांची भूमिका साकारली आहे. राजेश शर्मा एसपी रंजीतच्या भूमिकेत आहेत. याशिवाय सुमित सिंग, इशान मिश्रा, महेश बलराज, आकाश दहिया, मनोज जोशी, जरीना वहाब, सयाजी शिंदे हे कलाकार आहेत. (Celebrity)

रझा अकादमी आणि जमियत उलामा-ए-हिंद यांसारख्या अनेक इस्लामिक संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि आरोप केला आहे की यामुळे 'समाजात तेढ निर्माण होईल'. तसेच ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी यांची बदनामी करण्यासाठी या चित्रपटाचा वापर करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. (Trailer)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com