Jawan Music Director : जवानच्या संगीत दिग्दर्शकाने घेतलं ऑस्कर विजेते ए आर रेहमानपेक्षा भरभक्कम मानधन
Anirudh Ravichander Jawan Music Director Fees : शाहरुख खानच्या 'पठान' नंतर त्याच्या 'जवान' चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील लूक, चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ आणि प्रिव्हयु थीम सॉंग प्रेक्षकांच्या पंसतीस पडले आहेत. 'जवान' चित्रपटाविषयीची प्रत्येक अपडेट व्हायरल होते.
त्यामुळेच चित्रपटाच्या संगीताकडेही विशेष लक्ष दिले गेले आहे. चित्रपटाच्या संगीतासाठी अनिरुद्ध रविचंदरची निवड करण्यात आली आहे, जो या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी भरभक्कम मानधन देखील घेतले आहे. (Latest Entertainment News)
अनिरुद्ध रविचंदर हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव असून त्यांनी रजनीकांत ते कमल हासनपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांना संगीत दिले आहे. आता ते शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
यासाठी त्यांना देण्यात आलेले मानधन क्वचितच कोणत्याही भारतीय संगीत दिग्दर्शकाला एखाद्या चित्रपटासाठी मिळाले असेल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अनिरुद्धने जवान चित्रपटासाठी इतके मानधन घेऊन ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमानलाही मागे टाकले आहे.
ए आर रहमान एका चित्रपटासाठी 8 कोटी रुपये मानधन घेतात. संगीत दिग्दर्शकासाठीही ही खूप मोठी रक्कम आहे. मात्र शाहरुख खानच्या या मोठ्या चित्रपटासाठी अनिरुद्धला आणखी 10 कोटी दिले जात आहेत. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. जवान चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर दक्षिणेतील अभिनेत्री नयनतारा शाहरुख खानसोबत दिसणार आहे.
अनिरुद्ध रविचंदरविषयी बोलायचे झाले तर ते संगीत जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांचे चांगली नाव आहे. ते केवळ 32 आरशाचे असून त्यांनी या तरुण वयात खूप यश मिळवले आहे.
डॉन, मारी, डॉक्टर, मास्टर, विक्रम आणि बीस्ट या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. याशिवाय त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ते शाहरुखच्या जवान, रजनीकांतच्या जेलर आणि थलपती विजयच्या लिओमध्ये संगीत दिग्दर्शन करणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.