सध्या विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. तीनही भागांच्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘बॉईज ४’ आला आहे. यावेळी फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी फक्त ढुंग्या, धैर्या आणि कबीर या तिघांसोबतही आणखी बॉईजची टीम आपलं मनोरंजन करणार आहे.
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला गौरव मोरे देखील असणार आहे. नुकतंच गौरवने ‘साम टिव्ही’सोबत संवाद साधला. यावेळी त्याने त्याची निवड कशापद्धतीने झाली याविषयी सांगितले.
गौरवची निवड कशी झाली, याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी सांगितले की, आधी आम्ही गौरव मोरेला चित्रपटामध्ये फक्त काही वेळेच्या सीनसाठीच घेणार होतो. त्याच्या खास अभिनय आणि विनोदीशैलीमुळे त्याला चित्रपटामध्ये घ्यावे ही गोष्ट मला पार्थ आणि प्रतिकनेच सांगितले. त्याची निवड खरंतर त्या दोघांनीच केली आहे.
गौरव मोरेची चित्रपटामध्ये कशी निवड झाली याबद्दल तो सांगतो की, “कधीच कोणताही अभिनेता दुसऱ्या कोणाच्या कामाबद्दल दिग्दर्शकांना सांगत नाही. पण माझ्यासोबत उलटं घडलं. माझ्याबद्दल पार्थ आणि प्रतिकने दिग्दर्शकांना सांगितले. मला दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल फोन केला होता. ‘बॉईज ४’मध्ये तुझं एका दिवसाचं काम आहे. पण तुझं पात्र हे पुढच्या पार्टसोबत जोडलेलं आहे. मी लगेचच त्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल, असं सांगितलं. त्यानंतर काही दिवस झाले, तरीही मला दिग्दर्शकांचा फोन आला नाही. तर मी असिस्टंट डायरेक्टरांना फोन लावला, त्यांनी मला ऑफिसमध्ये येण्यासाठी सांगितलं.”
पुढे आपल्या मुलाखतीत गौरव मोरे सांगतो, “माझ्या कामाबद्दल पार्थ आणि प्रतिकने दिग्दर्शकांना सांगितले होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी मला मोठं पात्र द्यायचं ठरवलं. माझ्या भूमिकेमध्ये बदल केल्यामुळे शुटिंगचा काळ सुद्धा वाढला. निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार मित्रांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासच माझ्यासाठी कामाची पोचपावती आहे. खरंतर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी महत्वाची बाब आहे.”
चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, रितीका श्रोत्री, अभिनय बेर्डे, यतिन कार्येकर, समीर धर्माधिकारी, गौरव मोरे, निखिल बने, जुई बेंडखले, ऋतुजा शिंदे, ओम पाटील अशी स्टारकास्ट आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.