छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या ग्रँड प्रीमियरची काऊंट डाऊन सुरू झाली आहे. या शोबाबतचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. रोज या शोची नवनवीन माहिती समोर येत आहेत.
सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करणार असून त्याने यासाठी तगडे मानधन घेतल्याची चर्चा होत आहे. सलमान खानने घेतलेल्या मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही शॉक बसल्याशिवाय राहणार नाही.
'बिग बॉस १७' मुळे सलमान खान सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो व्हिडीओ समोर आला होता. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये कोण-कोण सेलिब्रिटी एन्ट्री करणार आहेत त्यांची नावं देखील समोर आली होती. आता या शोसाठी सलमान खानने किती फी घेतली त्याचा आकडा ही समोर आला आहे.
बिग बॉसच्या फॅन पेजनुसार, शो होस्ट करण्यासाठी सलमान खानला मोठी रक्कम दिली जात आहे. सलमान खान दर आठवड्याला १२ कोटी रुपये इतकी फी घेत आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सलमान खान हा शो होस्ट करतो. म्हणजेच तो प्रति एपिसोड ६ कोटी रुपये कमावणार आहे. इतकंच नाही तर हा शो त्याच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त किंवा जवळपास चार महिने चालला तर सलमान खान संपूर्ण सीझनमध्ये २०० कोटी रुपयांची मोठी कमाई करू शकतो. पण बिग बॉस १७ साठी सलमान खानने किती मानधन घेतले याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होते. सलमान खान २०१० पासून म्हणजे बिग बॉसच्या चौथ्या सीझनपासून हा शो होस्ट करत आहे. तेव्हापासून तो या शोचा एक खास भाग झाला आहे. सलमानशिवाय या शोला मजा नाही असे प्रेक्षकांना वाटते. त्यामुळे आतापर्यंत बिग बॉसचा प्रत्येक सीझन सलमान खानच होस्ट करतो.
सलमान खान बिग बॉसचा शो होस्ट करण्यासाठी दरवर्षी तगडं मानधन घेतो. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टिव्ही होस्टपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याची फी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, बिग बॉस सीझन १७ च्या थीमबद्दल बोलायचे झाले तर, सिंगल विरुद्ध कपल्स असा हा शो रंगणार असल्याचे सांगितले जात आहे. 'बिग बॉसचा १७' वा सीझन येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.