'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा सर्वांच्या लाडक्या गौरव मोरेचे नशीब पुन्हा फळफळलं आहे. गौरव मोरे लवकरच नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपटामध्ये (Parinirvaan Movie) गौरव मोरे महत्वाची भूमिका साकारणार आहे.
मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी काही दिवसांपूर्वीच 'परिनिर्वाण' चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता या चित्रपटामध्ये गौरव मोरे महत्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. गौरव श्यामरावची भूमिका साकारणार आहे. गौरव मोरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शनमध्ये 'एक नवीन सुरुवात' , असं लिहिलं आहे.
गौरव मोरेच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. तो परिनिर्वाण चित्रपटात दिसणार असल्यामुळे त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. त्यांनी कमेंट करत गौरव मोरेचे तोंडभरून कौतुक केले आहे. गौरवच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, 'नशीब काढलं भावा... खरंच नशीब काढलं बाबासाहेब यांच्यावर आधारलेल्या चित्रपटात भूमिका घेतोय...आम्ही नक्की बघायला येणार' तर, आणखी एका चाहत्याने कमेंट करत असे लिहिलं आहे की, 'गौऱ्याभाई फुल्ल फॉर्ममध्ये आहे.'
धर्मवीरच्या यशानंतर प्रसाद ओक लवकरच 'परिनिर्वाण' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. दरम्यान, ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले. महामानवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित केला. जवळपास ३००० फुटांची रिळ नामदेव व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळेच आज आपण परिनिर्वाणाची दृश्य पाहू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.